Jio Cinema चं रिब्रँडिंग होणार? मोफत सेवाही होणार बंद, लवकरच द्यावे लागू शकतात पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 12:31 PM2023-04-19T12:31:49+5:302023-04-19T12:55:23+5:30

Jio Voot Subscription: जिओ सिनेमाचा मोफत ॲक्सेस लवकरच संपण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्सनुसार, कंपनी या प्लॅटफॉर्मला रीब्रँडही करू शकते.

जिओ सिनेमा सध्या चर्चेत आहे. त्याच्या चर्चेचं कारण म्हणजे आयपीएल 2023 चा हंगाम. या प्लॅटफॉर्मवर तुम्ही IPL 2023 चा सीझन मोफत पाहू शकता.

तुम्ही जिओ युझर असाल किंवा नसाल कंपनी आपली सेवा सर्वांना मोफत देत आहे. परंतु कायमच असं राहणार नाही. जिओ सिनेमाच्या पेड व्हर्जन आणि रिब्रँडिंगबाबत काही रिपोर्ट्स समोर आले आहेत.

अहवालांवर विश्वास ठेवला तर, कंपनी या प्लॅटफॉर्मला Jio Voot म्हणून रीब्रँड करू शकते. Voot हे Viacom 18 चे आणखी एक OTT प्लॅटफॉर्म आहे. आयपीएलच्या या सीझननंतर रिलायन्स जिओ सिनेमा आणि वूट एकत्र मर्ज केले जातील अशी चर्चा आहे. पाहुया याचे डिटेल्स.

ओन्लीटेकवरील एका कम्युनिटी पोस्टनंतर त्याची चर्चा सुरू झाली आहे. या पोस्टमध्ये JioVoot च्या सबस्क्रिप्शन प्लॅनचीही माहिती देण्यात आली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून Jio त्याच्या OTT प्लॅटफॉर्म Jio Cinema चं सतत प्रमोशन करत आहे. कंपनीने त्यावर फिफा विश्वचषकही विनामूल्य प्रसारित केला.

ही सेवा केवळ जिओ युझर्ससाठी नाही तर सर्वांसाठी विनामूल्य आहे. आयपीएल 2023 सीझनचे मोफत प्रक्षेपणही यावर होत आहे, परंतु ही सेवा फार काळ मोफत राहणार नाही अशी शक्यता आहे. रिपोर्ट्सनुसार, आयपीएलच्या या सीझननंतर जिओ सिनेमाचे नाव बदलून जिओ वूट केले जाऊ शकते.

ही माहिती जिओ सिनेमाच्या APK मध्ये स्पॉट करण्यात आली आहे. याशिवाय इतरही काही तपशील समोर आले आहेत. कम्युनिटी पोस्टमध्ये युझरनं त्याच्या तपशीलांचा स्क्रीनशॉट देखील पोस्ट केला आहे.

अलीकडेच, रिलायन्सच्या मीडिया आणि कंटेंट बिझनेसच्या अध्यक्षा ज्योती देशपांडे यांनी एका मुलाखतीत याबद्दल एक संकेत दिले होते. लवकरच जिओ सिनेमात नवे बदल आणि नवीन कंटेंट्स पाहायला मिळतील, असे त्या म्हणाल्या होत्या. रीब्रँडिंग त्याचा एक भाग असेल अशी शक्यता आता व्यक्त करण्यात येतेय.

याशिवाय, कंपनी IPL 2023 नंतर सबस्क्रिप्शन मॉडेलवर स्विच करू शकते. याबाबत ज्योती देशपांडे यांनीही मुलाखतीत सांगितले होते. नवीन कंटेटसाठी किंमत मोजावी लागू शकते. कंपनी अंतिम किंमतीवर काम करत आहे. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर JioVoot चे सबस्क्रिप्शन 99 रुपयांपासून सुरू होऊ शकते.

अलीकडेच जिओ स्टुडिओनं त्यांच्या आगामी प्रकल्पांची घोषणा केली. यानुसार, JioStudio ब्रँड 100 ओरिजनल प्रोडक्शन घेऊन येत आहे. यामध्ये 'भेडिया' आणि 'स्त्री'च्या सिक्वेलसह शाहरुख खानच्या Dunki चा ही समावेश आहे.