Rakesh Jhunjhunwala चा मोठा सल्ला! प्रत्येकाने शेअर बाजारात गुंतवणूक करावी; सांगितली ‘ही’ ५ कारणे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2021 02:42 PM2021-11-07T14:42:22+5:302021-11-07T14:48:25+5:30

Rakesh Jhunjhunwala यांनी देशातील प्रत्येक व्यक्तीने शेअर बाजारात गुंतवणूक केली पाहिजे, असे म्हटले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून शेअर मार्केटमधील घोडदौड कायम असल्याचे दिसत आहे. दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या ट्रेंडिंग मुहुर्तालाही मुंबई शेअर बाजार आणि निफ्टी निर्देशांक वधारल्याचे पाहायला मिळाले.

शेअर मार्केटमध्ये बिग बुल म्हणून प्रसिद्ध असलेल्या राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांना शेअर मार्केटचा ट्रेंडिंग मुहूर्त मोठ्या प्रमाणावर लाभल्याचे सांगितले जात आहे. कारण मुहूर्तालाच राकेश झुनझुनवाला यांना तब्बल १०१ कोटींचा फायदा झाला आहे.

Rakesh Jhunjhunwala यांनी देशातील प्रत्येक व्यक्तीने शेअर बाजारात गुंतवणूक केली पाहिजे, असे म्हटले आहे. तुम्हाला चांगले रिटर्न मिळतात आणि टॅक्समध्येही सवलत मिळते, असेही राकेश झुनझुनवाला यांनी नमूद केले आहे.

गुंतवणूक हे व्यावसायिक काम आहे. मात्र, हे काम संघटित पद्धतीने करता येते. जर तुमच्याकडे काही पैसे असतील तर तुम्ही त्यातील काही भाग शेअर बाजारात नक्कीच गुंतवा. तुम्ही बाजारात दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास ते वार्षिक आधारावर १५ ते २० टक्के परतावा देईल, असे Rakesh Jhunjhunwala यांनी सांगितले.

याशिवाय यामध्ये गुंतवणुकीवर करातही सवलत आहे. तुम्ही ज्या शेअरमध्ये गुंतवणूक करत आहात त्यात गुंतवणूक करण्यापूर्वी त्या कंपनीचे बिझनेस मॉडेल कितपत यशस्वी आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. व्यवसायाची मागणी काय आहे? मागणी तशीच राहिली तर शेअर्स चांगलाच वधारतो, असे Rakesh Jhunjhunwala यांनी म्हटले आहे.

पैसा ही अशी गोष्ट आहे, ज्याचा प्रत्येकाने आदर केला पाहिजे, कारण त्याची किंमत खूप जास्त आहे. जीवन जगणे खूप गरजेचे आहे, सोबत ते गरजूंनाही वाटले पाहिजे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास हा व्यवसाय आहे. हे गुंतवणुकीपेक्षा जास्त आहे, असे Rakesh Jhunjhunwala म्हणाले.

जर तुम्ही शेअर बाजारातील गुंतवणूकदार असाल तर तुम्हाला वाटपाचे योग्य ज्ञान असणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे तुम्ही घर खरेदीसाठी किंवा नियमित उत्पन्नासाठी तयार आहात, त्याचप्रमाणे शेअर बाजारात येण्यापूर्वी पूर्ण तयारी करा, असा सल्ला Rakesh Jhunjhunwala यांनी दिला आहे. ते ईटी नाऊच्या एका कार्यक्रमात बोलत होते.

Rakesh Jhunjhunwala यांना टाटा मोटर्स, इंडियन हॉटेल्स, क्रिसिल, एस्कॉर्ट्स आणि डेल्टा ग्रुप या कंपनीच्या स्टॉक्सचा भरपूर लाभ मुहुर्ताला झाला, असे सांगितले जात आहे. राकेश झुनझुनवाला यांच्यासह डॉली खन्ना, आशीष कचोलिया आणि मुकुल अग्रवाल या बड्या गुंतवणूकदारांनी मुहुर्ताला जबरदस्त खरेदी केल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, Rakesh Jhunjhunwala यांनी शेअर मार्केटमध्ये २४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचे सांगितले जात आहे. राकेश झुनझुनवाला यांनी सप्टेंबर तिमाहीत टाटा समूहाच्या एका कंपनीत गुंतवणूक वाढवली असून, राकेश झुनझुनवाला यांची टाटा समूहाच्या तीन कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे.

Rakesh Jhunjhunwala यांच्या यासाठी टायटनचा हा शेअर्स चांगले रिटर्न देणारा ठरला आहे. राकेश झुनझुनवाला आणि त्यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी मिळून कंपनीत आपला हिस्सा वाढवला आहे. सध्या दोघांकडेही मिळून कंपनीचा ४.८७ टक्के हिस्सा आहे.

आताच्या घडीला Rakesh Jhunjhunwala यांच्याकडे Man Infraconstruction चे ३० लाख शेअर्स, Anant Raj कंपनीचे सुमारे १ कोटींचे स्टॉक, Tata Motors कंपनीचे ३,७७,५०,००० शेअर्स, Titan Stocks कंपनीचे ९६,४०,५७५ लाख शेअर्स आणि Delta Corp कंपनीचे ८५,००,००० शेअर्स आहेत.

Rakesh Jhunjhunwala हे एकटे शेअर मार्केटमधील बिगबूल नसून, त्यांच्यापेक्षाही अधिक गुंवतणूक असलेली एक व्यक्ती शेअर मार्केटमध्ये आहे. राकेश झुनझुनवाला यांचा गुंतवणुकीतील बाप म्हणून या व्यक्तीकडे पाहिले जाते. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून, अॅव्हेन्यू सुपरमार्टच्या माध्यमातून डीमार्टसारखी मोठी सुपर मार्केट चेन उभारणारे राधाकिशन दमानी (Radhakishan Damani) आहेत. राकेश झुनझुनवाला हेदेखील राधाकिशन दमानी यांना शेअर मार्केटमधील आपला गाइड आणि गुरुच मानतात, असे सांगितले जाते.