'एअर होस्टेस'च्या धर्तीवर आता 'ट्रेन होस्टेस', या रेल्वे गाड्यांत मिळणार 'विमाना'सारखी सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 05:16 PM2021-12-10T17:16:01+5:302021-12-10T17:32:35+5:30

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, विमानांमध्ये ज्याप्रकारे एअर होस्टेस असतात त्याच पद्धतीने हे होस्टेसही प्रोफेशनल असतील. यासाठी त्यांना रेल्वेकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे.

सेवा देण्याच्या बाबतीत भारतीय रेल्वे आता थेट विमानांशी स्पर्धा करणार आहे. यासाठी प्रीमियम ट्रेनमध्ये (Premium Trains) विमानांच्या (Flight) धर्तीवरच एअर हॉस्टेस (Air Hostess) सारखी सेवा देण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. एवढेच नाही, तर या गाड्यांमध्ये रेल्वे प्रवाशांना घरच्या सारखेच जेवणही देणार आहे.

या ट्रेन्समध्ये मिळणार फ्लाइट्सचा आनंद - प्रिमियम ट्रेन्समध्ये लवकरात लवकर ट्रेन होस्टेस (Train Hostess) सर्व्हिस सुरू होणार असल्याचे लाइव्हमिंटने इंडियन रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे. वृत्तानुसार, ही सर्विस वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express), गतिमान एक्सप्रेस (Gatiman Express) आणि तेजस एक्सप्रेस (Tejas Express) सारख्या प्रिमियम ट्रेन्समध्ये मिळेल.

मात्र, राजधानी एक्सप्रेस (Rajdhani Express) तसेच दुरंतो एक्सप्रेस (Duranto Express) सारख्या लांब पल्ल्याच्या प्रिमियम ट्रेन्समध्ये ट्रेन होस्टेसची सर्व्हिस उपलब्ध नसेल.

पुरुषांनाही होता येणार ट्रेन होस्टेस - केवळ महिलांनाच नाही तर पुरुषांनाही ट्रेन होस्टेस होता येणार आहे. हे ट्रेन होस्टेस केवळ दिवसाच सेवा देतील. रात्रीच्या वेळी त्यांची ड्युटी लावली जाणार नाही.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, विमानांमध्ये ज्याप्रकारे एअर होस्टेस असतात त्याच पद्धतीने हे होस्टेसही प्रोफेशनल असतील. यासाठी त्यांना रेल्वेकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे.

अधिकाधिक प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी भारतीय रेल्वे अनेक सुधारणांवर काम करत आहे. ट्रेन होस्टेस सेवा ही याच प्रयत्नांचा एक भाग आहे.

रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांचे स्वागत करण्याबरोबरच या होस्टेस त्यांना सीटवर बसवीणे, त्यांना चहापासून जेवणापर्यंतची सेवा देणे आणि प्रवाशांच्या तक्रारी ऐकून त्यांचे निराकरण करण्याचे काम करतील.

प्रवाशांना मिळणार घरच्या सारखे जेवण - याशिवाय, रेल्वेने प्रीमियम गाड्यांमध्ये प्रवाशांना पुरवल्या जाणाऱ्या जेवणाचा दर्जा सुधारण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. कोविडमुळे ऑनबोर्ड कुकिंग बंद करण्यात आला होता. तो पुन्हा सुरू होत आहे. आता या गाड्यांमध्ये प्रवाशांना पॅकबंद खाद्यपदार्थांऐवजी ताजे बनवलेले अन्न मिळणार आहे.

...म्हणजेच, एअर होस्टेस'च्या धर्तीवर आता लवकरच 'ट्रेन होस्टेस' दिसणार आहेत. त्या एअर होस्टेससारखीच सेवा देतील. यासाठी तयारीही सुरू झाली आहे.

ट्रेन होस्टेस...

Read in English