Anant Ambani Radhika Merchant Wedding :अनंत अंबानी पेक्षा वयाने मोठी आहे राधिका मर्चंट, जाणून घ्या किती आहे दोघांमधील अंतर!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 10:46 AM2023-01-30T10:46:43+5:302023-01-30T11:08:19+5:30

खूप कमी जणांना माहित असेल पण अंबानींची होणारी सून राधिका मर्चंट अनंत अंबानीहून वयाने मोठी आहे.

देशातील श्रीमंत कुटुंबांपैकी एक अंबानी कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. राधिका मर्चंट हिच्याशी अनंतचा साखरपुडा नुकताच पार पडला.

लग्नाअगोदर या कपलने नुकतेच तिरुमला हिल्स येथे पोहोचले. तिथे त्यांनी श्री व्यंकटेश मंदिरात दर्शन घेतले. सोशल मीडियावर त्यांचे फोटो, व्हिडिओ चांगलेच व्हायरल झाले.

राधिका आणि अनंत आधीपासूनच एकमेकांचे चांगले मित्र आहेत. देशातील मोठे उद्योगपती वीरेन मर्चंट आणि शैला मर्चंट यांची राधिका ही एकुलती एक मुलगी आहे. राधिका उत्तम भरतनाट्यम डान्सर आहे. तिने ८ वर्ष भरतनाट्यमचे शिक्षण घेतले आहे.

मात्र खूप कमी जणांना माहित असेल की राधिका अनंतपेक्षा वयाने मोठी आहे. होय. दोघेही एकमेकांना लहानपणीपासून ओळखतात. अनेक वर्ष एकमेकांच्या संपर्कात राहिल्यावर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.

अनंत अंबानी अंबानी कुटुंबातील सर्वात धाकटा मुलगा आहे. त्याचा जन्म १० एप्रिल १९९५ सालचा आहे. तर राधिकाचा जन्म १८ डिसेंबर १९९४ रोजी झाला आहे. म्हणजेच राधिका अनंतपेक्षा १ वर्षांनी मोठी आहे.

राधिकाचे कुटुंब अंबानी कुटुंबाला अनेक वर्षांपासून ओळखते आणि राधिका या देखील नीता अंबानींच्या खूप जवळ आहेत.

राधिका मर्चंट यांनी न्यूयॉर्क विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे आणि एओ पॉलिटिकल आणि इकॉनॉमिक्स ग्रॅज्युएट आहे.

आपल्या होणाऱ्या सूनेसाठी गेल्या वर्षी नीता अंबानी यांनी अरंगेत्रम सेरेमनीचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात बॉलिवुड कलाकारांनी देखील हजेरी लावली होती.

सध्या अनंत अंबानी हे त्यांच्या वाढलेल्या वजनामुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. अंबानी देशातील गर्भश्रीमंत कुटुंब आहे मात्र तितकेच परंपरांना जोडलेले आहेत हे वेळोवेळी दिसून आलं आहे.