Post Office ची जबरदस्त स्कीम, एकदा पैसे गुंतवा; नंतर व्याजाद्वारेच होईल ५ लाखांची कमाई, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 09:54 IST2025-12-06T09:37:29+5:302025-12-06T09:54:43+5:30

Post Office Investment: जर तुम्ही गुंतवणूक सुरू करण्याचा विचार करत असाल आणि आपले पैसे अशा ठिकाणी गुंतवू इच्छित असाल जिथे ते सुरक्षित राहतील आणि भरघोस परतावा मिळेल, तर पोस्ट ऑफिस स्मॉल सेव्हिंग स्कीम्स खूप लोकप्रिय आहेत.

Post Office Investment: जर तुम्ही गुंतवणूक सुरू करण्याचा विचार करत असाल आणि आपले पैसे अशा ठिकाणी गुंतवू इच्छित असाल जिथे ते सुरक्षित राहतील आणि भरघोस परतावा मिळेल, तर पोस्ट ऑफिस स्मॉल सेव्हिंग स्कीम्स खूप लोकप्रिय आहेत.

या योजनांमध्ये गुंतवणुकीवर सुरक्षेची हमी स्वतः सरकार देते. अशीच एक उत्कृष्ट योजना म्हणजे पोस्ट ऑफिस नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट स्कीम (NSC), ज्यात एकरकमी गुंतवणूक करून तुम्ही केवळ व्याजातून ५ लाख रुपयांची कमाई करू शकता.

प्रत्येक व्यक्ती आपल्या कमाईतील काही बचत करून ती अशा ठिकाणी गुंतवू इच्छितो, जिथे त्याला जबरदस्त परतावा मिळेल. या दृष्टीने पोस्ट ऑफिसची NSC योजना एक चांगला पर्याय ठरू शकते. सरकारकडून या स्मॉल सेव्हिंग स्कीममध्ये गुंतवणुकीवर ७.७% चा जबरदस्त व्याजदर दिला जात आहे. गुंतवणुकीवर मिळणारं व्याज चक्रवाढ पद्धतीनं दिलं जातं. व्याजाची ही रक्कम ५ वर्षांच्या गुंतवणुकीनंतरच खात्यात ट्रान्सफर केली जाते.

पोस्ट ऑफिसच्या राष्ट्रीय बचत योजना किंवा नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट स्कीममध्ये खातं उघडणं खूप सोपं आहे. तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये किमान १,००० रुपये गुंतवणुकीसह सुरुवात करू शकता, तर जास्तीत जास्त गुंतवणुकीसाठी कोणतीही मर्यादा नाही. NSC योजनेत मुलांच्या नावावरही खातं उघडता येतं. ठरलेल्या नियमांनुसार, १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाच्या नावावर उघडलेलं खातं त्याचे पालक ऑपरेट करतात.

या सरकारी योजनेत दिलं जात असलेल्या व्याजाचा पूर्ण फायदा घेण्यासाठी, तुमची गुंतवणूक लॉक-इन-पीरियड पर्यंत चालू ठेवावी लागेल, जो ५ वर्षांचा आहे. तरच तुम्हाला संपूर्ण व्याजाचे पेमेंट केले जाईल. या सरकारी योजनेत ऑनलाईन गुंतवणुकीची सुविधाही उपलब्ध आहे.

पोस्ट ऑफिस NSC योजनेला सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास, तुम्ही यात खातं उघडून ते एक वर्ष चालवल्यानंतर बंद केलं, तर तुम्हाला फक्त तुम्ही गुंतवलेली रक्कम परत केली जाईल, व्याजाचा एकही पैसा मिळणार नाही. त्यामुळे, सर्व फायदे घेण्यासाठी हे खाते पूर्ण पाच वर्षे ऑपरेट करणं आवश्यक आहे. या पोस्ट ऑफिस स्कीममध्ये चांगल्या व्याजासोबतच उत्पन्न कर कायद्याच्या कलम ८०सी अंतर्गत कर सवलतीचा लाभही मिळतो. एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त १.५ लाख रुपयांपर्यंतचा कर वाचवता येतो.

आता या पोस्ट ऑफिस योजनेत एकरकमी गुंतवणुकीद्वारे ५ लाख रुपयांची बंपर कमाई कशी केली जाऊ शकते, याचं गणित समजून घेऊया. NSC योजनेचा व्याजदर ७.७% आहे आणि जर एखाद्या गुंतवणूकदारानं ५ वर्षांच्या लॉक-इन-पीरियडसाठी एकाच वेळी ११,००,००० रुपये गुंतवले, तर चक्रवाढ व्याजासह त्याला मॅच्युरिटीवर १५,९३,९३७ रुपये मिळतील. यात ४,९३,९३७ रुपये हे फक्त व्याजाचे असतील. तसंच, तुम्ही गुंतवणूक वाढवून आणखी जास्त फायदा घेऊ शकता.