पोस्टाची जबरदस्त योजना! अवघ्या ३३ रुपयांच्या रोजच्या बचतीतून मिळणार तब्बल ७२,१२३ रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 06:54 PM2021-03-31T18:54:54+5:302021-03-31T19:00:59+5:30

Post Office Scheme: पोस्टाच्या योजना फायदेशीर ठरतात. आज अशाच एका जबरदस्त योजनेबाबत जाणून घेऊयात.

लोक सहसा बचतीसाठी बँक किंवा इतर काही योजनांमध्ये पैसे गुंतविण्याचा विचार करत असतात. पण पोस्टासारख्या सुरक्षित योजनांचा विचार करणं अतिशय महत्वाचं आहे. तुम्हालाही ठराविक मुदतीच्या कालावधीत थोड्या रकमेची रक्कम जमा करून मोठा निधी गोळा करायचा असेल तर टपाल कार्यालय वारंवार रेकरिंग डिपॉझिट योजना आणत असतं.

पोस्टाच्या या योजनेत तुम्हाला ७.१० टक्के व्याज मिळेल. याद्वारे आपण थोड्या रकमेतही मोठा निधी जमवू शकतो.

पोस्ट ऑफिस रेकरिंग डिपॉझिट योजनेत तुम्हाला जर दरमहा १ हजार रुपये गुंतवल्यास ७.१० टक्के व्याजदराने ते एका वर्षात १२,४६८.८४ रुपये होणार आहेत.

आपण हीच योजना ५ वर्षांसाठी केली. तर महिन्याला १ हजार रुपये म्हणजेच दिवसाला सुमारे ३३ रुपये गुंतवणूक केली. तर यातून ७२,१२२.९७ रुपयांचा निधी जमवू शकतो.

प्रत्येक महिन्याचे १ हजार याप्रमाणे ५ वर्षांची प्रिन्सिपल अमाऊंट ६० रुपये होते. त्यावर १२ हजार १२२ रुपये व्याज मिळते.

पोस्ट ऑफिस रेकरिंग डिपॉझिट योजनेचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला दरमहा निश्चित तारखेला पैसे जमा करावे लागतात. या योजनेत आपण १ ते १५ तारखेपर्यंत दरमहा पैसे जमा करू शकता.

पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिटमध्ये एकापेक्षा जास्त खाते देखील उघडता येऊ शकतात. हे खाते देशातील कोणत्याही पोस्ट ऑफिस शाखेत उघडता येते. जर खातेदारांची इच्छा असेल तर २ लोक एकत्र देखील हे खाते वापरू शकतात.

पोस्ट ऑफिस बचत योजनांमध्ये ४ टक्क्यांपासून ते ८.४ टक्के व्याज मिळते. इंडिया पोस्टच्या संकेतस्थळावर प्रत्येक योजनेची संपूर्ण माहिती सहज मिळू शकते. अशा ९ बचत योजना आहेत, ज्यात गुंतवणूक करुन चांगले व्याज मिळवता येते.