Post Office ची तुफान स्कीम; महिन्याला ₹२०००, ₹३०००, ₹५००० वर मिळेल जबरदस्त रिटर्न, प्रत्येक जण विचारेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 09:14 IST2025-03-03T09:08:13+5:302025-03-03T09:14:12+5:30

Post Ofice Investment Scheme: दर महिन्याला छोटी बचत करून भविष्यासाठी मोठा फंड तयार करायचा असेल तर पोस्ट ऑफिसची ही स्कीम तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते. पाहा कोणती आहे ही स्कीम

Post Ofice Investment Scheme: दर महिन्याला छोटी बचत करून भविष्यासाठी मोठा फंड तयार करायचा असेल तर पोस्ट ऑफिस आरडी स्कीम तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते. यामध्ये दरमहा ₹२०००, ₹३००० किंवा ₹५००० अशी छोटी रक्कम गुंतवून तुम्ही सुरक्षित आणि खात्रीशीर परतावा मिळवू शकता. पोस्ट ऑफिस आरडी योजनेवर वार्षिक ६.७ टक्के व्याज मिळतं, जे चक्रवाढ व्याज म्हणून जोडलं जातं आणि मुदतपूर्तीनंतर मोठी रक्कम तयार होते.

पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (RD) योजना ही अतिशय सुरक्षित आणि खात्रीशीर परताव्याची बचत आहे. या योजनेत तुम्ही कमीत कमी १०० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता आणि दरमहा थोडी रक्कम जोडून सहज मोठा फंड तयार करू शकता.

या योजनेत तुम्हाला ६.७% पर्यंत वार्षिक व्याज मिळू शकतं, जे चक्रवाढ तत्त्वावर जोडलं जातं. या योजनेचा कालावधी ५ वर्षांपर्यंत आहे, त्यानंतर तुम्हाला संपूर्ण पैसे व्याजासह परत मिळतात.

जर तुम्ही दरमहा ₹२००० ची गुंतवणूक केली तर ५ वर्षात एकूण गुंतवणूक ₹१,२०,००० होईल. यानंतर मॅच्युरिटीवर तुम्हाला १,४२,७३२ रुपये मिळतील. यात २२,७३२ रुपये व्याज म्हणून मिळतील.

जर तुम्ही दरमहा ₹३००० ची गुंतवणूक केली तर ५ वर्षात एकूण गुंतवणूक ₹१,८०,००० होईल. मॅच्युरिटीवर तुम्हाला २,१४,०९७ रुपये मिळतील. तर व्याज म्हणून तुम्हाला ३४,०९७ रुपये मिळतील.

जर तुम्ही दरमहा ₹५००० ची गुंतवणूक केली तर ५ वर्षात एकूण गुंतवणूक ₹३,००,००० होईल. मॅच्युरिटीवर तुम्हाला ३,५६,८३० रुपये मिळतील. तर ५६,८३० रुपये व्याज म्हणून मिळणार आहेत.

ही एक सुरक्षित गुंतवणूक योजना आहे, ज्याला सरकारचं पाठबळ आहे आणि ही गुंतवणूक जोखीममुक्त आहे. तुम्ही १०० रुपयांपासून सुरुवात करू शकता आणि यात शेअर बाजारासारखे चढउतार होण्याचा धोका नाही.