भारीच! MSMEsला Paytm देणार 1000 कोटींचं कर्ज, कुठल्याही गॅरंटीशिवाय मिळणार 5 लाखांचं लोन

By श्रीकृष्ण अंकुश | Published: November 9, 2020 06:05 PM2020-11-09T18:05:40+5:302020-11-09T18:16:56+5:30

पेटीएमने मर्चंट लेंडिंग बिझनेसवर आपली पकड मजबूत करण्यासाठी मार्च, 2021पर्यंत सूक्ष्म लघु तसेच मध्यम स्वरुपांच्या उद्योगांना (MSMEs) 1,000 कोटी रुपयांचे कर्ज देण्याची योजना तयार केली आहे.

Paytm अशा उद्योजकांना कर्ज देईल, ज्यांना रेग्युलर बँकांकडून रोजगार सुरू करण्यासाठी लोन मिळत नाही.

आर्थिक वर्ष 2019-20मध्ये Paytmने MSMEsला कर्जाच्या स्वरूपात 550 कोटी रुपये दिले होते. मात्र कंपनीने यावेळी ही रक्कम वाढवून 1,000 कोटी परुपये केली आहे.

Paytm बरोबरच गूगल पे (Google pay) आणि फोन पे (PhonePE)नेही व्यापारी कर्ज देण्याच्या क्षेत्रात पाऊल ठेवले आहे.

गूगल पे आणि फोन पे अनेक लायसंसी बँका आणि NBFCsच्या सोबतीने छोट्या व्यापाऱ्यांना कर्ज देत आहेत.

Paytmने गुगल पे आणि फोन पे यांना काउंटर करण्यासाठी MSMEsसाठी कर्ज देण्याच्या रकमेत वाढ केली आहे.

Paytm Lendingचे सीईओ भावेश गुप्ता म्हणाले, कंपनी कुठल्याही स्वरुपाच्या गॅरंटी शिवाय कुटलीही गोष्ट तारण न ठेवता, छोट्या व्यापाऱ्यांना आणि MSMEsना अत्यंत कमी व्याजदरात 5 लाख रुपयांपर्यंत इंस्टंट लोन (collateral-free instant loans) देईल.

गुप्ता म्हणाले, कंपनी आपल्या मर्चंट लेंडिग प्रोग्राम अंतर्गत ग्राहकांना पेटीएम बिझनेस अॅपवर collateral-free instant loans अत्यंत सहजपणे उपलब्ध करून देईल.

कर्ज घेण्यासाठी कोण पात्र आहे आणि कोण नाही, हे Paytm Business appचे अल्गोरिदम निश्चित करेल.

व्यापाऱ्याकडून पेटीएमवर करण्यात येणाऱ्या दैनंदिन सेटलमेंटच्या आधारे, Paytm Business appचे अल्गोरिदम, कर्ज घेणारी व्यक्ती त्या कर्जाची परतफेड करण्यास सक्षम आहे की नाही, यासंदर्भात निर्णय घेते.

आर्थिक वर्ष 2019-20मध्ये Paytmने 1 लाखहून अधिक छोट्या व्यापाऱ्यांना आणि MSMEsना 550 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते.

Paytm Lending सीईओ भावेश गुप्ता यांनी सांगितले, कर्ज मिळविण्यासाठी अर्ज करण्यापासून ते लोन देण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आहे. तसेच यासाठी कुठल्याही स्वरुपाच्या अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता नाही.