मोदी सरकारचं शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट! मिळणार 3 लाख रुपयांचा फायदा; जाणून घ्या, कुणाच्या खात्यात येणार पैसा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 05:01 PM2022-08-30T17:01:09+5:302022-08-30T17:11:39+5:30

केंद्र सरकारकडून (Central Government Scheme) शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध प्रकारच्या स्कीम चलविल्या जात आहेत. याअंतर्गत आर्थिक सहाय्यही दिले जात आहे.

शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जर आपणही शेतकरी असाल आणि पशुपालन करत असाल, तर आपल्याला केंद्रातील मोदी सरकारकडून तब्बल 3 लाख रुपयां फायदा मिळणार आहे. केंद्र सरकारकडून (Central Government Scheme) शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध प्रकारच्या स्कीम चलविल्या जात आहेत. याअंतर्गत आर्थिक सहाय्यही दिले जात आहे. आज आम्ही आपल्याला अशाच एका योजनेसंदर्भात माहिती देत आहोत.

काय आहे योजना? पीएम किसान सन्मान निधी आणि किसान क्रेडिट कार्ड शिवाय, पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांनाही सरकारकडून क्रेडिट कार्डची सुविधा दिली जाते. या कार्डला पशु किसान क्रेडिट कार्ड (Pashu Kisan Credit Card) असे म्हटले जाते. याच कार्डच्या माध्यमाने आपल्याला 3 लाख रुपयांचा फायदा मिळेल.

पशुपालन व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी दिली जातेय सुविधा - महत्वाचे म्हणजे, जे शेतकरी गाय, म्हैस, बकरी अथवा मच्छीपालनासारखे व्यवसाय करतात, त्या सर्व शेतकऱ्यांना सरकारकडून हे कार्ड दिले जात आहे. या योजनेअंतर्गत, केंद्र आणि राज्यांमध्ये पशूपालनाला प्रोत्साहन देणे असा केंद्र सरकारचा उद्देश आहे. यामुळे देशभरातील दूध, दूधाचे पदार्थ आणि मांसाची कमतरता पूर्ण केली जाईल.

आधी लोन मिळविण्यासाठी माराव्या लागायच्या बँकेच्या फेऱ्या - आधी पशुपालकांना लोन मिळविण्यासाठी बँकेकडे अर्ज करावा लागत होता. मात्र, आता पशु किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमाने त्यांना आवश्यकता भासल्यास सहजपणे कर्ज मिळते. याशिवाय मोदी सरकार शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेंतर्गत दर वर्षी 6000 रुपयांचा फायदाही देत आहे.

केंद्र सरकारच्या या योजनेंतर्गत नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला होता. यानंतर, किसान क्रेडिट कार्ड पशुपालन आणि मच्छी पालनाला जोडण्यात आले. म्हणजेच पीएम किसानचा फायदा घेणारे शेतकरीही या कार्डची सुविधा घेऊ शकतात.

या डॉक्युमेंट्सची असेल आवश्यकता - पशू किसान क्रेडिट कार्ड मिळविण्यासाठी आपल्याला, शेतकऱ्याचे आधार कार्ड, शेतकऱ्याचे पॅनकार्ड, शेतकऱ्याच्या जमिनीचा तपशील आणि पासपोर्ट साईज फोटो. या चार गोष्टी आवश्यक आहेत.

सरकारकडून मिळते सब्सिडी - सध्या पशुपालकांना Credit Card च्या माध्यमातून जास्तीत जास्त 3 लाख रूपयांपर्यंतचे लोन दिले जाते. या लोनवर बँकेकडून 7 टक्क्यांप्रमाणे व्याज घेतले जाते. मात्र, केंद्र आणि राज्य सरकार पशुपालकांना यावर सब्सिडीही देते. जर एखाद्या शेतकऱ्याला या लोनवर सब्सिडी मिळवायची असेल, तर त्याला एका वर्षाच्या आत हे लोन चुकते करावे लागते.

कुठून बनवता येईल हे कार्ड? - आपण हे कार्ड आपल्या घरा शेजारी असलेल्या कुठल्याही सीएससी केंद्रावर जाऊन तयार करू शकता.