Multibagger Share : ५₹ चा शेअर पोहोचला ७३० रुपयांवर, सहा महिन्यात गुंतवणूकदारांच्या १ लाखाचे झाले १.४९ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 03:54 PM2022-04-19T15:54:37+5:302022-04-19T16:20:43+5:30

Multibagger Share : गेल्या काही ट्रेडिंग सेशन्सपासून या शेअरला अपर सर्किट लागत आहे. कामकाजाच्या गेल्या ५ दिवसांमध्ये या शेअरच्या किंमतीत तब्बल २२ टक्क्यांची वाढ झाली आहे.

SEL मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे शेअर्स (SEL manufacturing share price) BSE वर 4.99 टक्क्यांनी वधारून 729.65 रुपयांवर ट्रेड करत आहेत. गेल्या काही ट्रेडिंग सेशन्सपासून या शेअरमध्ये सातत्यानं अपर सर्किटही लागत आहे. कामकाजाच्या गेल्या पाच दिवसांमध्ये हा शेअर जवळपास २२ टक्क्यांनी वधारला आहे.

याचप्रकारे जर एखाद्या गुंतवणूकदारानं या वर्षी या शेअरमध्ये 104.05 रुपये प्रति शेअरच्या हिशोबानं पैसे गुंतवले असतील, तर त्याची किंमत आज 7 लाख रुपये असती. तर दुसरीकडे महिन्याभरात गुंतवणूकदारानं एक लाख रुपये गुंतवले असते तर त्याची किंमत आज 2.28 लाख रुपये असती.

या वर्षी 3 जानेवारीला कंपनीचे शेअर्स 104.05 रुपयांवर होते. त्याचप्रमाणे, गेल्या एका महिन्यात हा शेअर 318.65 रुपयांवरून 729.65 रुपयांपर्यंत वाढला. या कालावधीत या शेअरनं आपल्या गुंतवणूकदारांना 129 टक्क्यांचे रिटर्न दिले आहेत.

एसईएल मॅन्युफॅक्चरिंगच्या शेअर प्राईज हिस्ट्रीनुसार जर कोणत्याही गुंतवणूकदारानं 5.01 रुपयांच्या हिशोबानं यात 1 लाख रुपये गुंतवले असतील तर त्याची आज किंमत 1.45 कोटी रुपये झाली असती.

याचप्रकारे जर एखाद्या गुंतवणूकदारानं या वर्षी या शेअरमध्ये 104.05 रुपये प्रति शेअरच्या हिशोबानं पैसे गुंतवले असतील, तर त्याची किंमत आज 7 लाख रुपये असती. तर दुसरीकडे महिन्याभरात गुंतवणूकदारानं एक लाख रुपये गुंतवले असते तर त्याची किंमत आज 2.28 लाख रुपये असती.

एसईएल मॅन्युफॅक्चुरिंग कंपनी वर्टिकल इंटिग्रेटेड मल्टी प्रोडक्ट टेक्सटाईल कंपनी आहे. ही कंपनी यार्न, फॅब्रिक, रेडिमेड गार्मेंट्स आणि टॉवेलचं उत्पादन, प्रकिया आणि व्यापारात सक्रिय आहे. बीएसईवर या कंपनीचं मार्केट कॅप 2417 कोटी रुपये होतं.

डिसेंबर 2021 च्या तिमाहीत कंपनीच्या प्रमोटर्सची होल्डिंग 75.27 टक्क्यांवर अपरिवर्तित राहिली. एफआयआयचा हिस्सा डिसेंबर तिमाहीत 0.13 टक्क्यांवरून अपरिवर्तित राहिला. तथापि, डिसेंबर तिमाहीत एफआयआय गुंतवणूकदारांची संख्या 16 वरून 15 वर घसरली.

चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत तीन विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांकडे (FPIs) 42,178 शेअर्स होते. मात्र, ही कंपनी सध्या तोट्यात आहे आणि स्टॉकमध्ये टर्नओव्हरही कमी आहे.