अवघ्या ६० पैशांच्या शेअरनं केली कमाल, वर्षभरात ३५३३ टक्के रिटर्न; १ लाखाचे झाले ३६ लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 10:25 PM2022-02-03T22:25:50+5:302022-02-03T22:32:08+5:30

मल्टीबॅगर स्टॉक्स (multibagger stocks) गेल्या काही काळापासून गुंतवणूकदारांना (Share Market Investment) मोठे रिटर्न्स देत आहेत.

मल्टीबॅगर स्टॉक्स (multibagger stocks) गेल्या काही काळापासून गुंतवणूकदारांना (Share Market Investment) मोठे रिटर्न्स देत आहेत. अशा शेअर्समध्ये योग्य वेळी गुंतवणूक करून व्यापारी प्रचंड नफा कमावत आहेत.

आज आम्ही अशाच आणखी एका शेअरबद्दल सांगत आहोत, ज्याने गुंतवणूकदारांना फार कमी वेळात कोट्यधीश बनवलं आहे. या कंपनीचे नाव आहे एमआयसी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (MIC Electronics Limited). एमआयसी LED व्हिडीओ डिस्प्ले, हाय-एंड इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकॉम उपकरणे आणि दूरसंचार सॉफ्टवेअरचे डिझाइन, विकास आणि निर्मितीमध्ये कार्यरत आहे

कंपनीच्या शेअर्सबद्दल सांगायचे झाले तर, गेल्या वर्षी मार्चमध्ये एमआयसी इलेक्ट्रॉनिक्सच्या एका शेअरची किंमत फक्त 60 पैसे होती आणि सध्या कंपनीच्या एका शेअरची किंमत 21.80 रुपये आहे.

जर तुम्ही कंपनीचे शेअर्स मार्चमध्ये या किंमतीला एक लाख रुपयांना विकत घेतले असते, तर तुम्हाला १.६७ लाख शेअर्स मिळाले असते.

आजच्या हिशोबाने तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य सुमारे ३६ लाख रुपये झाले असते. अशा प्रकारे, कंपनीच्या शेअर्सने 11 महिन्यांत गुंतवणूकदारांना 3533% परतावा दिला आणि त्यांना कोट्यधीश बनवले आहे.

2013 मध्ये MIC इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने नाशिक महानगरपालिकेसोबत (NMC) करार केला. 2014 मध्ये, MIC इलेक्ट्रॉनिक्सने LED आधारित 3D-होलोग्राम लाँच केले. 2015 मध्ये, MIC ला इलेक्ट्रॉनिक्स बॅग LED लाईटच्या पुरवठ्यासाठी ऑर्डर मिळाली.

2016 मध्ये MIC Electronics Limited आणि LG Innotech यांनी LG Innotek द्वारे तयार करण्यात येणाऱ्या कॉम्पोनन्टचा वापर करत एनर्जी एफिशिअंट एलईडी लायटिंग उत्पादनांचं संयुक्तरित्या विकसित करण्याचा करार केला. याशिवाय, कंपनीला RailTel Corporation of India (रेल्वे मंत्रालय) कडून डिस्प्ले नेटवर्क ऑर्डर मिळाली आहे.