Multibagger Stock : फार्मा कंपनीने केले मालामाल; 12 रुपयांचा शेअर 1200 वर पोहचला, 1 लाखाचे झाले 1 कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 05:10 PM2023-03-15T17:10:17+5:302023-03-15T17:13:16+5:30

Multibagger Stock: फॉर्मा क्षेत्रातील या दिग्गज कंपनीने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.

Multibagger Stock: फार्मा क्षेत्रातील दिग्गज कंपनी अजंता फार्माच्या (Ajanta Pharma) शेअर्सनी गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. बुधवारी हा शेअर लाल चिन्हावर ट्रेड करत आहे, परंतु दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी हा मल्टीबॅगर ठरला आहे.

आगामी काळातही अजंता फार्माचा शेअर उसळी घेऊ शकतो. बुधवारी हा शेअर 1.11 टक्क्यांनी घसरुन 1,191 रुपयांवर बंद झाला. अजंता फार्माच्या शेअर्सने गुंतवणूकदारांचे 1 लाख रुपये 1 कोटींमध्ये बदलले आहेत.

29 जानेवारी 2010 रोजी अजंता फार्माच्या शेअर्सची किंमत 12.14 रुपये होती. सध्या हा 1200 च्या जवळ आहे. आपण या स्टॉकच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकाबद्दल बोललो तर तो 1427.50 रुपयांच्या पातळीवर होता.

या शेअरच्या 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 1061.77 रुपये आहे. गेल्या 5 दिवसांत अजंता फार्माचा शेअर 3.97 टक्क्यांनी घसरला असून, गेल्या एका महिन्यात 2.10 टक्क्यांनी घसरला आहे. तर, सहा महिन्यांत स्टॉक 8.52 टक्क्यांनी घसरला आहे.

29 जानेवारी 2010 पासून या स्टॉकची वाढ पाहिली तर ती 100 वेळा झाली आहे. म्हणजेच गेल्या 13 वर्षात या शेअरने 10 हजार टक्‍क्‍यांनी झेप घेतली आहे आणि गुंतवणूकदारांची एक लाख रुपयांची रक्कम एक कोटींमध्ये बदलली आहे.

जानेवारी 2010 मध्ये एखाद्या व्यक्तीने अजंता फार्माच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर तो आज त्या व्यक्तीला 1 कोटी रुपये मिळाले असते. म्हणजेच,दीर्घकालीन गुंतवणुकदारांसाठी हा शेअर फायद्याचा ठरला आहे.

11 मे 2022 रोजी स्टॉकने 52 आठवड्यांची नीचांकी किंमत रु. 1062.73 गाठली. यानंतर, पुढील चार महिन्यांत स्टॉकने 34 टक्क्यांनी झेप घेतली आणि 9 सप्टेंबर 2022 रोजी तो 1425.80 च्या पातळीवर पोहोचला.

मात्र, त्यानंतर अजंता फार्माच्या शेअरची गती थांबली आणि घसरणीचा टप्पा सुरू झाला. पण येत्या काही दिवसांत हा शेअर सध्याच्या पातळीपासून 16 टक्क्यांपर्यंत रिकव्हर होऊ शकतो, असे बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे. त्याची बाजारपेठ 15,512.75 कोटी रुपये आहे.