शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

छप्परफाड रिटर्न : ‘या’ ऑटो कंपनीनं ५ वेळा दिले बोनस शेअर्स, १ लाखांचे झाले १७ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2022 9:07 PM

1 / 5
Investment In Share Market Multibagger Share : जर दीर्घ काळासाठी गुंतवणूक केली तर मिळणारा परतावा हा अधिक असतो असं म्हटलं जातं. एखादी छोटी गुंतवणूकही तुम्हाला कोट्यधीश बनवू शकते. असाच लोकांना कोट्यवधींचा परतावा मिळवून देणारा स्टॉक म्हणजे संवर्धन मदरसन या कंपनीचा आहे.0
2 / 5
ही कंपनी ऑटो कॉम्पोनंटशी संबंधित आहे. या कंपनीने गुंतवणूकदारांना केवळ मोठा परतावाच दिला नाही तर अनेक वेळा बोनस शेअर्सचे वाटपही केले आहे. गेल्या 20 वर्षांमध्ये कंपनीनं 1:2 प्रमाणात बोनस शेअर देण्याची घोषणा केली होती. यानंतर १० वर्षांमध्ये कंपनीनं चार वेळा 1:2 प्रमाणात चार वेळा शेअर्सचं वाटप केलं आहे.
3 / 5
20 वर्षांपूर्वी एखाद्या गुंतवणूकदारानं या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रूपये गुंतवले असते तर त्या व्यक्तीला 1,81,818 शेअर मिळाले असते. तर ऑक्टोबर 2012 मध्ये 1:2 प्रमाणानुसार शेअर 272727 इतके झाले असते.
4 / 5
या कंपनीनं नंतर आणखी चार वेळा बोनस शेअर देण्याची घोषणा केली. त्यावेळी देखील कंपनीनं 1:2 प्रमाणात बोनस शेअर दिले. यानंतर शेअरधारकांकडे एकूण 1380678 शेअर झाले असते.
5 / 5
सध्या संवर्धन मदरसन या कंपनीच्या शेअरची किंमत 123.70 रूपये आहे. जर एखाद्या गुंतवणूकदारानं या शेअरमध्ये 20 वर्षांपूर्वी पैसे गुंतवले तर त्याच्या 1 लाखांचं मूल्य आज 17 कोटी रूपये झालं असतं. कंपनीनं आतापर्यंत जर कोणत्याही बोनस शेअरची घोषणा केली नसती तर या 1 लाखांचं मूल्य आज 2.25 कोटी असतं.
टॅग्स :share marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूक