TATA ला जमलं नाही ते Reliance ने केलं! ‘या’ कंपनीवरील अधिग्रहण प्रक्रिया पूर्ण; पाहा, डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2021 02:44 PM2021-09-03T14:44:44+5:302021-09-03T14:51:04+5:30

या कंपनीतील हिस्सा खरेदीबाबत TATA समूहाकडूनही प्रयत्न करण्यात आले होते. त्यानंतर Reliance समूहाने एंट्री घेतली आणि करार पूर्णत्वास नेला.

रतन टाटा यांचा TATA समूह आणि मुकेश अंबानी यांच्या Reliance इंडस्ट्रीजमधील काही कंपन्यांमध्ये कांटे की टक्कर असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोना संकट काळात या दोन्ही बड्या उद्योग समूहांनी नवनवीन क्षेत्रात पदार्पण सुरू केले आहे.

TATA ग्रुप अनेकविध क्षेत्रात दमदार कामगिरी करत आहे. TATA ग्रुपच्या अनेक कंपन्या भन्नाट रिटन्सही देत आहेत. तसेच टाटा आता नवनव्या क्षेत्रातही पदार्पण करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

TATA ग्रुप देशातील सर्वांत यशस्वी उद्योगांपैकी एक असून, ऑटोमोबाइल, विमान, इन्सुरन्स, स्टील, केमिकल अशा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये TATA ग्रुपने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

Reliance इंडस्ट्रीजचेही अनेक प्रमाणात असेच चित्र पाहायला मिळत आहे. मुकेश अंबानी अनेकविध क्षेत्रात Reliance इंडस्ट्रीजचा दबदबा निर्माण करत आहेत.

मात्र, Reliance इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी आता रिटेल क्षेत्रात मोठी आघाडी घेण्यासाठी एक मोठी योजना आखली आहे. कोट्यवधी व्यवसायिकांपर्यंत पोहोचण्यासाठी मुकेश अंबानी यांनी थेट एका कंपनीला मोठी ऑफर दिली होती. यानंतर या कंपनीचे शेअर्सही कमालीचे वाढले.

देशभरातील व्यवसायिकांची माहिती एकाच मंचावर संकलित करणारी Just Dial ही सर्च आणि लिस्टिंग कंपनी आहे. छोट्या मोठ्या व्यवसायिकांपर्यंत पोहोचण्यासाठी Reliance चा जस्ट डायल कंपनीसोबतचा करार पूर्ण झाला असून, आता ४०.९० टक्के म्हणजेच जवळपास ४१ टक्के हिस्सेदारी रिलायन्सकडे आली आहे.

Just Dial कंपनीतील हिस्सा खरेदीबाबत TATA समूहाकडूनही एप्रिल महिन्यात प्रयत्न करण्यात आले होते, मात्र बोलणी फिस्कटली होती. त्यानंतर Reliance समूहाने यात एंट्री घेतली आणि करार पूर्णत्वास नेला.

Reliance ने Just Dial मधील हिस्सा खरेदीसाठी तब्बल ३ हजार ४९७ कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याची माहिती मिळाली आहे. यानंतर Just Dial वर Reliance नियंत्रण असेल, असे सांगितले जात आहे.

तंत्रज्ञान विकासाने ई-कॉमर्स कंपन्या, बी टू बी मंच नावारूपाला आले असले तरी त्यांची पोहोच मर्यादित आहे. Just Dial कडे देशभरातील तब्बल ३ कोटी व्यावसायिकांचा डेटाबेस आहे.

आर्थिक वर्ष २०२० मध्ये जस्ट डायल वर सरासरी १५ कोटी ३३ लाख युनिक युजर्सने भेट दिली. सुमारे ८२ टक्के युजर जस्ट डायल मोबाईल आणि ऍपमधून सर्च करतो.

जवळपास २५० हून अधिक शहरे आणि ११ हजार पिनकोड्समधील व्यावसायिकांची जस्ट डायलकडे आहे माहिती आहे. आर्थिक वर्ष २०२० मध्ये कंपनीला ९५० कोटींचा महसूल मिळाला.

३१ मार्च २०२० अखेर २७२.९ कोटींचा नफा झाला आहे. कंपनीमध्ये ३५.३२ टक्के हिस्सा प्रवर्तकांचा आहे तर २८.६८ टक्के परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा आहे. Reliance ने सेबीच्या टेकओव्हर नियमकांनुसार जस्ट डायलमधील हिस्सावर नियंत्रण मिळवले आहे.

Reliance रिटेल आणि जस्ट डायचे संस्थापक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी वीएसएस मणी यांच्यात यासंदर्भात करार झाला आहे. रिलायन्सने ब्लॉक डीलनुसार, जस्ट डायलचे १.३१ कोटी इक्विटी शेअर्स १० रुपये किमतीने खरेदी केले. ही खेदी १०२० रुपये प्रति इक्विटी शेअर्सच्या किमतीनुसार झाली. रिलायन्सने जस्ट डायलच्या अन्य भागधारकांसाठी २६ टक्के शेअर्स खरेदी करण्याची खुली पेशकश केल्याचे सांगितले जात आहे.

Read in English