शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पेटीएमला मोठा दिलासा, 'या' अमेरिकन कंपनीने केली 244 कोटींची गुंतवणूक!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2024 4:45 PM

1 / 6
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) बंदीनंतर पेटीएमवर (Paytm) वाईट वेळ आली आहे. दरम्यान, पेटीएमला अमेरिकेकडून मोठा दिलासा मिळाला आहे. एका अमेरिकन बहुराष्ट्रीय गुंतवणूकदार कंपनीने Paytm ची मूळ कंपनी वन 97 कम्युनिकेशन्समध्ये ( One97 Communications) 244 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
2 / 6
अमेरिकन बहुराष्ट्रीय गुंतवणूकदार कंपनी मॉर्गन स्टॅनलीने (Morgan Stanley) पेटीएममध्ये 0.8 टक्के हिस्सा खरेदी केला आहे. कंपनीने ओपन मार्केटद्वारे वन 97 कम्युनिकेशन्समध्ये 244 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
3 / 6
मॉर्गन स्टॅनलीची आशियामध्ये व्यवसाय करणारी कंपनी मॉर्गन स्टॅनल आशिया सिंगापूर प्रायव्हेट लिमिटेडने पेटीएमच्या मूळ कंपनीचे 50 लाख शेअर्स विकत घेतले आहेत. यासाठी कंपनीने पेटीएमच्या प्रत्येक शेअरची किंमत 487. 2 रुपये निश्चित केली आहे.
4 / 6
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट्स बँकेवर बंदी घातल्यानंतर तिच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. दोन दिवसांत कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांनी घसरले आहेत. हे 487.20 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.
5 / 6
पेटीएमचे करपूर्व उत्पन्न (EBITDA) 300 ते 500 कोटी रुपयांनी कमी होऊ शकते, असे असा अंदाज रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कारवाईनंतर पेटीएमचा आहे. अशा स्थितीत एवढ्या मोठ्या अमेरिकन कंपनीने पेटीएमवर विश्वास दाखवल्याने तिच्या शेअरला स्थैर्य मिळणे अपेक्षित आहे.
6 / 6
मात्र, गेल्या वर्षी वॉरेन बफेटच्या बर्कशायर हॅथवेने कंपनीत 5 वर्षे गुंतवणूक केल्यानंतर पेटीएममधील आपला संपूर्ण हिस्सा तोट्यात विकला. तेव्हा पेटीएमच्या शेअरची किंमत 877.20 रुपये होती. या डीलमध्ये वॉरन बफेटला सुमारे 700 कोटी रुपयांचे नुकसान झाले.
टॅग्स :Paytmपे-टीएमbusinessव्यवसाय