LPG Price Today: ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच तारखेला आनंदाची बातमी! LPG च्या दरात मोठी कपात; जाणून घ्या नवा दर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 09:28 AM2022-08-01T09:28:48+5:302022-08-01T09:34:07+5:30

सर्वसामान्यांना मोठा दिलासा...!

कमर्शिअल LPG सिलिंडरच्या किमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. आजपासून म्हणजेच 1 ऑगस्टपासून कमर्शिअल सिलिंडरच्या दरात 36 रुपयांची कपात करण्यात आली आहे. महागाईच्या काळात ही सर्वसामान्यांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे.

आजपासून 19kg कमर्शिअल सिलेंडर दिल्लीमध्ये 2012.50 रुपयांऐवजी 1976.50 रुपयांना मिळेल. कोलकात्यात 2132.00 रुपयांऐवजी 2095.50 रुपयांना मिळेल.

मुंबईचा विचार करता, मुंबईत 19kg चे कमर्शिअल सिलेंडर खरेदी करण्यासाठी 1936.50 रुपये मोजावे लागतील. तर चेन्नईमध्ये याची किंमत 2141 रुपये एवढी असेल.

घरगुती सिलिंडरच्या किंमतीत कुठलाही बदल नाही - महत्वचे म्हणजे, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही. दिल्लीत घरगुती LPG सिलिंडर खरेदी करण्यासाठी आपल्याला 1053 रुपये मोजावे लागतात. कोलकात्यात घरगुती LPG सिलिंडरसाठी 1079 रुपये मोजावे लागतात. तर मुंबईमध्ये यासाठी 1052 रुपये मोजावे लागतात.

जुलै महिन्यातही कमर्शिअल सिलिंडरच्या दरात करण्यात आली होती कपात - यापूर्वी, जुलै महिन्यात कमर्शिअल सिलिंडरच्या दरात 8.50 रुपयांची कपात करण्यात आली होती. तेव्हा दिल्लीत कमर्शिअल सिलिंडरची किंमत कमी होऊन 2012.50 रुपये, मुंबईत 1,972.50 रुपये, कोलकात्यात 2,132 रुपये तर चेन्नईत 2,177.50 रुपये झाली होती.

घरगुती स्वयंपाकाच्या गॅसचे दर - घरगुती गॅसच्या दरात 6 जुलै रोजी सिलिंडरमागे 50 रुपयांची वाढ करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय स्तरावरील दरवाढीनंतर, मे महिन्यापासूनची ही एलपीजीच्या किंमतीतील तिसरी दरवाढ आहे.

यानंतर, दिल्लीत सब्सिडी नसलेले 14.2 किलोग्रॅमचे एलपीजी सिलिंडरचा दर 1,053 रुपये झाला आहे. जो आधी 1,003 रुपये एवढा होता. यापूर्वी 7 मे रोजी सिलिंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ झाली होती. याही पूर्वी 22 मार्चला देखील प्रती सिलिंडर एवढीच वाढ करण्यात आली होती.