LIC च्या आयपीओचा पॉलिसीधारकांना मोठा फायदा; फक्त 'ही' तयारी ठेवा, मालामाल व्हा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 02:49 PM2021-07-27T14:49:14+5:302021-07-27T14:59:18+5:30

all you know about LIC IPO: एलआयसी विमा बाजारात एकाधिकारशाही असलेली कंपनी आहे. यामुळे पुढेही एलआयसीचा थाट असाच राहण्याची शक्यता अधिक आहे. यामुळे गुंतवणूकदार एलआयसीमध्ये पैसे लावण्याच्या तयारीत आहेत.

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (LIC) आयपीओ (IPO) आणण्याच्या जोरदार तयारीला लागली आहे. एवढ्या मोठ्या कंपनीचा आयपीओ आणणे एवढी सोपी बाब नाहीय. यामुळे एलआयसीचा आयपीओ मार्च 2022 च्या अखेरपर्यंत बाजारात येण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ जानेवारी ते मार्च दरम्यान कधीही येणार आहे. कॅबिनेटने एलआयसीमधील निर्गुंतवणुकीलाही परवानगी दिली आहे. (10 percent shares reserved for LIC Policy holders, Also in low price. )

LIC IPO Policy holders benefit: एलआयसीचा आयपीओ (LIC IPO) आला तर त्याचा सर्वात मोठा फायदा हा पॉलिसीधारकांना (Policy holders) होणार आहे. एलआयसीचे 10 टक्के शेअर हे पॉलिसीधारकांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. पॉलिसीधारकांना अन्य लोकांपेक्षा कमी पैशांमध्ये हे शेअर मिळू शकतात.

पॉलिसीधारकांनी सध्या एलआयसीची जवळपास 28.9 कोटी पॉलिसी खरेदी केल्या आहेत. यामुळे एलआयसीला 10 टक्के राखीव कोटा सेबीच्या नियमांनुसारच द्यावा लागणार आहे. पैकी बरेच पॉलिसीधारक शेअर खरेदी करतीलच असे नाही.

आयपीओच्या नियमानुसार कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी शेअरवर 10 टक्के सूट देऊ शकते. मात्र, पॉलिसीधारक हे काही कर्मचारी नाहीत. यामुळे एलआयसी शेअरवर पॉलिसीधारकांना किती सूट देते हे पहावे लागणार आहे.

लिस्टेड झाल्यानंतर एलआयसीला तिमाही, सहामाही सारखे फायद्या,तोट्याचे निकाल जाहीर करावे लागणार आहेत. तसेच प्रमुख घटनांची स्टॉक एक्सेंजच्या माध्यमातून लोकांना वेळोवेळी माहिती द्यावी लागणार आहे.

सरकार जर पॉलिसीधारकांना 10 सूट देऊन शेअर देत असेल तर शेअर बाजारात लिस्ट झाल्यानंतर एलआयसीचे व्हॅल्यूएशन 10 ते 15 लाख कोटी रुपये होऊ शकते. सेबीनुसार 10 लाख कोटींच्या कंपनीसाठी 55000 कोटी रुपयांचा आयपीओ, तर 15 लाख कोटी रुपयांसाठी 80000 कोटी रुपयांचा आयपीओ आणावा लागणार आहे. असे झाल्यास अधिक शेअर पॉलिसीधारकांना मिळू शकतात.

एलआयसीच्या आयपीओची किंमत किती असेल हे देखील पाहणे गरजेचे आहे. कारण सरकारी विमा कंपन्यांच्या आयपीओचा अनुभव खूप वाईट आहे.

2017 मध्ये न्यू इंडिया अशुरन्स कंपनीचा शेअर 770-780 रुपयांना ऑफर करण्यात आला होता. बीएसईवर हा शेअर 748.90 रुपयांना लिस्ट झाला होता. आता तो शेअर 158 रुपयांवर आला आहे.

तसेच जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे झाले. एनएसईवर 857.50 रुपयांना लिस्ट झालेला शेअर आज 174 रुपयांवर आहे.

परंतू एलआयसी या दोन कंपन्यांपेक्षा वेगळी आहे. विमा बाजारात एकाधिकारशाही असलेली कंपनी आहे. यामुळे पुढेही एलआयसीचा थाट असाच राहण्याची शक्यता अधिक आहे. यामुळे गुंतवणूकदार एलआयसीमध्ये पैसे लावण्याच्या तयारीत आहेत.

एलआयसीची बाजारात हिस्सा हा 66 टक्के आहे. 22.78 लाख एजंट आणि 2.9 लाख कर्मचारी एलआयसीकडे आहेत.

एलआयसी शेअर बाजाबारातील सर्वात मोठी गुंतवणूकदारांपैकी एक आहे. तसेच ती सरकारसाठी अनेकदा तारणहार ठरते. मोठी गुंतवणूक असल्याने चांगला परतावा ही मिळतो. यामुळे पॉलिसीधारकांना शेअर विकत घेण्यासाठी पैसे तयार ठेवावे लागणार आहेत.