शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

LIC च्या 'या' स्कीममध्ये महिलांना मिळेल मोठी रक्कम, छोट्या बचतीतून होईल लाखोंचा नफा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2023 8:18 AM

1 / 7
एलआयसी योजनांमध्ये गुंतवणूक करून लोकांना खात्रीशीर परतावा मिळतो. एलआयसीच्या गुंतवणूकीत बाजारातील धोक्यांचा सामना करावा लागत नाही. या कारणास्तव बहुतेक लोक एलआयसी योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात.
2 / 7
आज आम्ही तुम्हाला एलआयसीच्या आणखी एका जबरदस्त योजनेबद्दल सांगणार आहोत, जी विशेषतः महिलांसाठी चालवली जात आहे. या योजनेचे नाव एलआयसी आधार शिला योजना (LIC Aadhaar Shila Plan) आहे. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही दीर्घकाळात मोठा परतावा मिळवू शकता.
3 / 7
एलआयसी आधार शिला योजना ही एक नॉन-लिंक्ड, पर्सनल लाईफ इन्शुरन्स स्कीम आहे. ही योजना खास महिलांसाठी तयार करण्यात आली आहे. या पॉलिसीच्या मॅच्युरिटीवर गुंतवणूकदाराला निश्चित रक्कम मिळते.
4 / 7
जर पॉलिसीधारकाचा पॉलिसी पूर्ण होण्यापूर्वी मृत्यू झाला तर अशा परिस्थितीत कुटुंबाला आर्थिक मदत मिळते. केवळ शारीरिकदृष्ट्या निरोगी लोक (healthy lives without undergoing any medical examination) या योजनेत गुंतवणूक करू शकतात.
5 / 7
आधारशिला पॉलिसी अंतर्गत, एलआयसी आधारशिला योजनेंतर्गत मूळ विमा रक्कम किमान ७५,००० रुपये आणि कमाल ३,००,००० रुपये आहे. मॅच्युरिटीसाठीचं कमाल वय ७० वर्षे आहे म्हणजेच मॅच्युरिटीच्या वेळी पॉलिसीधारकाचं वय ७० वर्षांपेक्षा जास्त नसावं.
6 / 7
मॅच्युरिटी झाल्यावर, पॉलिसीधारकाला एकरकमी रक्कम मिळते. तुम्ही ही योजना खरेदी केल्यास, तुम्हाला मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक प्रीमियम भरण्याचा पर्याय दिला जातो.
7 / 7
हे पॉलिसी UIDAI द्वारे जारी केलेलं आधार कार्ड असलेल्या महिलांसाठी तयार करण्यात आली आहे. यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी महिलेचं वय ८ ते ५५ वर्षे दरम्यान असणं आवश्यक आहे. याशिवाय केवळ शारीरिकदृष्ट्या निरोगी लोक (healthy lives without undergoing any medical examination) या योजनेत गुंतवणूक करू शकतात.
टॅग्स :LIC - Life Insurance CorporationएलआयसीInvestmentगुंतवणूकMONEYपैसा