हाऊस वाईफ आहात?, कशी कराल इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग; 'या' पाच ठिकाणी गुंतवणूक करत मिळवा जबरदस्त रिटर्न

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 11:57 AM2022-03-19T11:57:35+5:302022-03-19T12:03:07+5:30

अनेकदा गृहिणी घरखर्चासाठी लागणाऱ्या पैशांमधूनही बचत करत असतात. ते पैसे योग्य ठिकाणी गुंतवले तर त्यातून मोठा परतावाही मिळू शकतो.

गुंतवणुकीबाबत (Investment tips) विचार केला तर तुमच्यासमोर डझनभर पर्याय उपलब्ध आहेत. गृहिणी कुटुंबाचा सांभाळ करत सातत्यानं आपलं मोलाचं योगदान देतच असतात. अनेकदा गृहिणी घरखर्चासाठी लागणाऱ्या पैशांमधूनही बचत करत असतात.

जर ती काही पैसे वाचत असतील तर ती रक्कम योग्य ठिकाणी गुंतवणे महत्वाचे आहे. जेणेकरून तिचे मूल्य वाढतच जाईल. गृहिणी कशाप्रकारे आपलं फायनॅन्शिअल प्लॅनिंग (Financial planning) करू शकतात, हे आपण पाहूया.

म्युच्युअल फंड (Mutual Fund) हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय आहे. यामध्ये मिळणारा परतावाही उत्तम आहे. म्युच्युअल फंडात गुंतवणूक SIP च्या मदतीने करता येते. अनेक म्युच्युअल फंडांमध्ये १०० रुपयांची मासिक गुंतवणूक देखील केली जाऊ शकते. योग्य वेळी, महिला त्यांच्या बचतीतून अतिरिक्त NAV खरेदी करू शकतात. गरजेच्या वेळी एनएव्ही विकूनही पैसे परत घेता येतात.

महिला बाँडमध्येही गुंतवणूक करू शकतात. हे एखाद्या कर्जासारखे आहे, ज्याच्या खरेदीवर वार्षिक आधारावर व्याज मिळते. या काळात तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित असतात. तथापि, बॉन्ड्सवर मिळणारा परतावा खूप कमी आहे.

महिलांना दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करायची असेल तर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) ही एक उत्तम योजना आहे. एका आर्थिक वर्षात PPF मध्ये किमान ५०० रुपये जमा करणे आवश्यक आहे. त्यासाठी किमान १५ वर्षे गुंतवणूक करावी लागेल. सात वर्षांनंतर आंशिक पैसे काढण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. सध्या त्यावर वार्षिक ७.१ टक्के व्याज मिळते.

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये गॅरंटीड रिटर्न उपलब्ध आहे. यासाठी लॉक-इन कालावधी ५ वर्षांचा आहे. यामध्ये किमान १००० रुपये गुंतवावे लागतील. सध्या याचा व्याजदर ६.८ टक्के इतका आहे.

महिलांची आवड शेअर बाजारात असेल तर त्या थेट इक्विटीमध्ये गुंतवणूक करू शकतात. यामध्ये परतावा जास्त असतो पण जोखीमही जास्त असते. गुंतवणूकीची योग्य माहिती मिळवा, योग्य स्टॉक निवडा. तुम्ही योग्य वेळी योग्य शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. (टीप: कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेऊनच गुंतवणूक करावी.)