Home Loan टॉप-अप करण्यापूर्वी 'या' गोष्टींवर नक्की लक्ष द्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 03:11 PM2021-03-17T15:11:37+5:302021-03-17T15:19:47+5:30

Home Loan Topup : वाचा कोणत्या गोष्टींवर लक्ष ठेवाल

कधी आपल्याला अचानक पैशांची गरज भासली तर अशा परिस्थितीत आपल्यासमोर सर्वात सोपा पर्सनल लोनचा पर्याय दिसतो. परंतु पर्सनल लोनचे व्याजदरही अधिक असतात.

त्यामुळे रक्कम परत करताना आपल्याला इतर लोनच्या तुलनेनं अधिक रक्कम परत करावी लागते. परंतु यासाठी आणखी एक पर्यायही उपलब्ध आहे.

जर तुम्ही होम लोन घेतलं असेल तर तुम्ही त्यावर टॉपअपही करू शता. परंतु यासाठी काही अटी आहेत, ज्या तुम्हाला पूर्ण करणं अनिवार्य आहे.

जर तुम्ही होम लोनवर टॉप अप लोन घेत असाल तर तुम्ही वर्षभर न चुकवता ईएमआय भरलेला असणं आवश्यक आहे.

उदा. जर तुम्ही १२ महिने ईएमआय भरले असतील तर बँक तुम्हाला होम लोनच्या १० टक्के रक्कम ही टॉपअप म्हणून देऊ शकते.

याशिवाय जर तुम्ही २४ महिने ईएमआय भरला असेल तर बँक तुम्हाला होम लोनच्या २० टक्के रक्कम टॉपअप म्हणून देऊ शकते.

होम लोनवर टॉपअप घेताना याची प्रोसेस पूर्णपणे होम लोन प्रमाणेच असेल. यासाठी तुम्हाला तुमच्या संपत्तीची कागजपत्रे, पत्ता, ओळखपत्र आणि उत्पन्नाचा पुरावा द्यावा लागेल.

बँकांप्रमाणे टॉपअप लोनचा कालावधी निराळा असू शकतो. भारतीय स्टेट बँक ही होम लोनवर ३० वर्षांसाठी टॉपअप लोन देते. तर इंडियन बँक १० वर्षांसाठी देते.

टॉपअप लोनसाठी तुम्हाला तुलनेनं अधिक व्याज द्यावं लागेल. व्याजदर हा लोन घेणाऱ्या व्यक्तीच्या क्रेडिट हिस्ट्रीवर अवलंबून असतो.

अॅक्सिस बँक टॉपअप लोनवर ८.६५ टक्के व्याजदर आकारते. तर स्टेट बँक ७.५० टक्क्यांपासून ९.८० टक्क्यांपर्यंत व्याजदर आकारते.

टॉपअप लोन अंतर्गत लोनची कमाल मर्यादाही निश्चित केलेली असते. उदा. पाहायचं झालं तर अॅक्सिस बँकेत टॉपअप लोनची मर्यादा ५० लाख रूपये तर इंडियन बँकेत ही मर्यात ६० लाख रूपये आहे.

बँक ऑफ बडोदासारख्या बँक टॉपअप लोन घेणाऱ्याच्या वयानुसारही लोनची रक्कम ठरवत असतात.

जर तुम्ही घराच्या डागडुजीसाठी किंवा नवीन करण्यासाठी लोन घेत असाल तर तुम्हाला कराची सूटही मिळेल.

टॉपअप लोनचे व्याजदर हे पर्सनल लोनच्या व्याजापेक्षा कमी असतात. तसंच टॉपअप लोनअंतर्गत दिलेल्या पैशाच्या वापरावर कोणतेही निर्बंध नसतात.

या लोनसाठी कोणतीही अतिरिक्त वस्तू गहाण ठेवण्याची गरज नाही. लोन प्रक्रिया अधिक जलद आणि परफेडीचा कालावधीही अधिक मोठा असतो.