रेल्वे कंपनीचा शेअर रॉकेट बनला, साडेतीन वर्षांत ₹7 वरून ₹300 वर पोहोचला! दिला 4300% परतावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 02:44 PM2023-10-02T14:44:44+5:302023-10-02T14:52:50+5:30

हा शेअर गेल्या केवळ साडेतीन वर्षांत 7 रुपयांवरून 300 रुपयांवर पोहोचला आहे.

भारतीय रेल्वे आणि इतर अनेक खाजगी कंपन्यांसाठी, मालवाहतुकीसाठी वापरले जाणारे डबे, प्रवाशांसाठी वापरले जाणारे डबे आणि संरक्षण सेवेत वापरली जाणारी वाहने तयार करणाऱ्या ज्युपिटर वॅगन्स लिमिटेडचा (Jupiter Wagons) शेअर सध्या रॉकेट बनला आहे. हा शेअर गेल्या केवळ साडेतीन वर्षांत 7 रुपयांवरून 300 रुपयांवर पोहोचला आहे.

या साडेतीन वर्षांच्या कालावधीतच ज्युपिटर वॅगन्सच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 4300 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. भारतीय कंपन्यांशिवाय ज्युपिटर वॅगन्स उत्तर अमेरिका आणि युरोपातही आपल्या उत्पादनांचा पुरवठा करते.

ज्युपिटर वॅगन्सचा शेअर 27 मार्च 2020 रोजी 7.32 रुपयांवर होते. तो 29 सप्टेंबर 2023 ला 327.55 रुपयांवर बंद झाला. ज्युपिटर वॅगन्सच्या शेअरने गेल्या साडेतीन वर्षांत गुंतवणूकदारांना तब्बल 4375% एवढा परतावा दिला आहे.

एखाद्या गुंतवणूकदाराने गेल्या 27 मार्च 2020 रोजी ज्युपिटर वॅगन्सच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती आजपर्यंत कायम ठेवली असती, तर आता आज तिचे मुल्य 44.75 लाख रुपयांवर पोहोचले असते.

एका वर्षात कंपनीचा शेअर 355 टक्क्यांनी वधारला - ज्युपिटर वॅगन्सचा शेअर 3 ऑक्टोबर 2022 रोजी 72 रुपयांवर होता. तो 29 सप्टेंबर 2023 ला 327.55 रुपयांवर बंद झाला. गेल्या एका वर्षात या शअरने 355 टक्क्यांचा परतावा दिला आहे.

या वर्षाचा विचार करता, कंपनीच्या शेअरमध्ये आतापर्यंत 240 टक्क्यांची तेजी आली आहे. रेल्वे कंपनीचा शेअर 2 जानेवारी 2023 रोजी 96.35 रुपयांवर होता. तो 29 सप्टेंबर 2023 ला 327.55 रुपयांवर पोहोचला आहे.

गेल्या 6 महिन्यांचा विचार करता ज्यूपिटर वॅगन्सच्या शेअरमध्ये 239 टक्क्यांची तेजी दिसून आली आहे. ज्यूपिटर वॅगन्स च्या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 350 रुपये एवढा आहे. तर निचांक 321.45 रुपये एवढा आहे. तसेच या कंपनीचे मार्केट कॅप 13085 कोटी रुपये एवढे आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)