शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Jiofiber Rs 399 Plan: Jio युझर्सची धमाल, 399 रुपयांत 3300GB डेटा आणि कॉलिंग; पाहा स्वस्त आणि मस्त प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2022 5:10 PM

1 / 5
Jiofiber Rs 399 Plan: जर तुम्ही देखील नवीन ब्रॉडबँड कनेक्शन घेण्याचा विचार करत असाल परंतु नवीन कनेक्शन घेण्यापूर्वी तुम्ही प्रत्येक कंपनीच्या प्लॅन्स पाहत असाल, तर आज आम्ही तुमच्यासाठी एक स्वस्त आणि मस्त प्लॅनची माहिती घेऊन आलो आहोत.
2 / 5
आज आम्ही तुमच्यासाठी स्वस्त आणि मस्त JioFiber प्लॅन आणला आहे. जो तुम्हाला 400 रुपयांपेक्षा कमी किमतीत 3300GB डेटा देईल. पाहूया हा नक्की कोणता प्लॅन आहे आणि यामध्ये तुम्हाला आणखी कोणते बेनिफिट्स मिळतात.
3 / 5
399 रुपयांच्या या प्लॅनमध्ये यूजर्सला 30 Mbps च्या फास्ट स्पीडसह अमर्यादित डेटा ऑफर केला जात आहे. या प्लॅनमध्ये डेटाशिवाय यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही मिळणार आहे.
4 / 5
येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की या प्लॅनसह युझर्सना समान अपलोड आणि डाउनलोड स्पीड मिळेल, म्हणजेच तुम्ही या प्लानसह रिचार्ज केल्यास तुम्हाला 30Mbps अपलोड आणि डाउनलोड स्पीड मिळेल.
5 / 5
किंमत पाहून तुम्हालाही हा प्लॅन आवडला असेल आणि जर तुम्ही हा प्लान रिचार्ज करण्याचा विचार करत असाल, तर एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, की या प्लानमध्ये तुम्हाला 18 टक्के GST चार्ज देखील भरावा लागेल. 399 रुपयांवर 18 टक्के जीएसटी 71.82 रुपये असेल, म्हणजेच या प्लॅनसाठी तुम्हाला 470 रुपये मोजावे लागतील.
टॅग्स :Reliance Jioरिलायन्स जिओ