अनंत अंबानींपेक्षाही मोठं लग्न? 'या' शाही विवाहात प्रत्येक पाहुण्यावर ४२ लाख होणार खर्च, २०० VIP
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 10:15 IST2025-05-21T10:12:40+5:302025-05-21T10:15:14+5:30
jeff bezos lauren sanchezs : बेझोस जून २०२६ मध्ये इटलीच्या प्रसिद्ध व्हेनिस शहरात त्यांची वाग्दत्त वधू लॉरेन सांचेझशी लग्न करणार आहेत. या विवाहाच्या तारखेपेक्षा होणारा खर्च चर्चेत आहे.

गेल्या वर्षी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांच्या शाही विवाह सोहळ्याची जगभरात चर्चा झाली होती. पण आता त्याहूनही मोठा आणि शाही विवाह सोहळा जगाला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आणि ॲमेझॉनचे (Amazon) संस्थापक जेफ बेझोस (Jeff Bezos) पुन्हा एकदा बोहल्यावर चढणार आहेत.
जेफ बेझोस जून २०२६ मध्ये इटलीतील प्रसिद्ध व्हेनिस शहरात त्यांची वाग्दत्त वधू (होणारी पत्नी) लॉरेन सांचेझशी (Lauren Sanchez) लग्न करणार आहेत. या लग्नाची तारीख किंवा ठिकाण नाही, तर या भव्य कार्यक्रमावर होणारा खर्च सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा शाही विवाह सोहळा २४ जून ते २६ जून २०२६ या तीन दिवसांसाठी चालणार आहे. या खास कार्यक्रमात फक्त २०० खास पाहुण्यांना आमंत्रित केले जाईल. या संपूर्ण सोहळ्याचा खर्च सुमारे १ कोटी डॉलर्स (आजच्या दरानुसार जवळपास ८३ कोटी रुपये) असेल असा अंदाज आहे.
या लग्नातील पाहुण्यांची यादी खूपच खास आणि हाय-प्रोफाइल आहे. यामध्ये इवांका ट्रम्प आणि जेरेड कुशनर यांच्यासोबतच किम कार्दशियन, क्रिस जेनर, केटी पेरी आणि ऑरलँडो ब्लूम यांसारखे हॉलिवूड स्टार्स असणार आहेत.
याशिवाय ओप्रा विन्फ्रे, बिल गेट्स आणि मिरांडा केर यांसारखी मोठी नावेही या कार्यक्रमाची शोभा वाढवू शकतात. धक्कादायक बाब म्हणजे, प्रत्येक पाहुण्यावर सरासरी ५०,००० डॉलर्स, म्हणजेच अंदाजे ४२ लाख रुपये खर्च येणार आहे.
जेफ बेझोस यांचे हे आगामी लग्न जगातील सर्वात महागड्या आणि चर्चेतील विवाहांपैकी एक ठरणार आहे, यात शंका नाही.