महायुतीने चार प्रभाग निवडणुकीआधीच गमावले; बंडखोरीची केली चिंता, पण बसला मोठा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 05:26 IST2026-01-09T05:25:36+5:302026-01-09T05:26:56+5:30

२२७ प्रभागांपैकी महायुती २२३ जागांवर महायुतीचे उमेदवार रिंगणात असणार आहेत. 

bmc election 2026 mahayuti lost four wards before the elections worried about rebellion but suffered a big blow | महायुतीने चार प्रभाग निवडणुकीआधीच गमावले; बंडखोरीची केली चिंता, पण बसला मोठा फटका

महायुतीने चार प्रभाग निवडणुकीआधीच गमावले; बंडखोरीची केली चिंता, पण बसला मोठा फटका

सुजित महामुलकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत भाजप-शिंदेसेनेच्या महायुतीने बंडखोरांना अर्ज भरण्याची संधी मिळू नये, यासाठी प्रचंड गुप्तता पाळली. मात्र, त्याचा फटका महायुतीलाच बसला असून चार प्रभागांत उमेदवार नसल्याने महायुतीने हे प्रभाग गमावल्याच्या जमा आहेत. यामुळे २२७ प्रभागांपैकी महायुती २२३ जागांवर महायुतीचे उमेदवार रिंगणात असणार आहेत. 

एकीकडे राज्यात अनेक शहरात महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे चित्र आहे. दक्षिण मुंबईतील प्रभाग २११ आणि २१२ तसेच ट्रॉम्बे-चिता कॅम्पमधील प्रभाग १४५ आणि कुर्ला पश्चिमेकडील प्रभाग क्रमांक १६७ मध्ये महायुतीचे उमेदवार रिंगणात नसणार आहेत. त्यामुळे विरोधी पक्ष आपसात भिडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

सर्वसाधारणपणे अधिकृत उमेदवारासोबत एक डमी उमेदवार अर्ज दाखल करण्याची प्रथा यापूर्वी होती. याचे कारण अधिकृत उमेदवाराचा अर्ज काही कारणास्तव बाद झाला तर डमी उमेदवाराचा अर्ज अधिकृत होऊन तो निवडणूक लढवतो. यावेळी जागावाटपातील गोंधळ आणि गुप्तता ठेवल्याने डमी उमेदवाराचा अर्ज भरला गेला नाही, असे सूत्रांनी सांगितले. 

महायुतीच्या अनुपस्थितीत होणारी लढत

प्रभाग १४५ : राष्ट्रवादी (अजित पवार), काँग्रेस आणि उद्धवसेना
प्रभाग १६७ : काँग्रेस, उद्धवसेना आणि समाजवादी पक्ष
प्रभाग २११ : राष्ट्रवादी (अजित पवार), काँग्रेस, समाजवादी पक्ष
प्रभाग २१२ : काँग्रेस, मनसे आणि अखिल भारतीय सेना

Web Title : महायुति को चुनाव से पहले आंतरिक कलह के कारण चार वार्डों का नुकसान

Web Summary : आंतरिक कलह और गोपनीयता पर ध्यान केंद्रित करने के कारण, महायुति गठबंधन ने चुनाव से पहले चार वार्डों को खो दिया। मुंबई के मुख्य वार्डों में डमी उम्मीदवारों की कमी से विपक्ष के लिए रास्ते खुल गए।

Web Title : Mahayuti Loses Four Wards Before Election Due to Internal Conflicts

Web Summary : Due to internal conflicts and a focus on secrecy, the Mahayuti alliance forfeited four wards before elections. Lack of dummy candidates in key Mumbai wards leaves them open to opposition parties.