तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 16:10 IST2025-04-28T16:06:11+5:302025-04-28T16:10:21+5:30
Home loan Personal loan: काही खरेदी करायचं असेल, तर प्रत्येकालाच कर्जाची गरज पडते. पण, उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ साधताना बऱ्याचदा कर्ज घ्यावं लागतं. अनेकदा गृहकर्ज असतं, मग वैयक्तिक कर्ज घ्यावं लागलं, तर?

घरखरेदी करताना बरेचजण गृहकर्जाचा आधार घेतात. या खर्चातील मोठा भाग कर्जामुळे भागवता येतो. परंतु घरासाठी डाउन पेमेंट, रजिस्ट्रेशन फी, दुरुस्ती किंवा नूतनीकरण यासाठीही अधिकचा खर्च करावा लागतो.
अशा वेळी लोक बचत काढण्याऐवजी पर्सनल लोन काढण्याचा विचार करतात. जर आधीपासून गृहकर्ज सुरू असेल तर पर्सनल लोन घेता येते का, याबाबत अनेकांना नीट माहिती नसते.
घरखरेदी करताना बरेचजण गृहकर्जाचा आधार घेतात. या खर्चातील मोठा भाग कर्जामुळे भागवता येतो.
परंतु घरासाठी डाउन पेमेंट, रजिस्ट्रेशन फी, दुरुस्ती किंवा नूतनीकरण यासाठीही अधिकचा खर्च करावा लागतो. अशा वेळी लोक बचत काढण्याऐवजी पर्सनल लोन काढण्याचा विचार करतात.
जर आधीपासून गृहकर्ज सुरू असेल तर पर्सनल लोन घेता येते का, याबाबत अनेकांना नीट माहिती नसते. हफ्त्यांमध्ये हे कर्ज फेडता येते. पण पर्सनल लोन असुरक्षित मानले जात असते.
यात तारण द्यावे लागत नाही. परतफेड कालावधी लहान असतो परंतु व्याज अधिक असते. हे कर्ज मंजूर करण्याची प्रक्रिया झटपट पूर्ण केली जात असते.
जर क्रेडिट स्कोअर ७०० किंवा त्याहून अधिक असेल, तर पर्सनल लोन मिळण्यात अडचणी येत नाहीत. तुमच्या मासिक उत्पन्नाचा ५० टक्केपेक्षा जास्त हिस्सा ईएमआयमध्ये जाऊ नये याची काळजी घेणे गरजेचे आहे.