LIC ची ही पॉलिसी खरेदी कराल तर महिन्याला मिळतील २० हजार, खर्चाचं टेन्शन नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 02:04 PM2023-01-02T14:04:18+5:302023-01-02T14:09:24+5:30

नववर्षात तुम्ही गुंतवणूकीचा विचार करत असाल तर एलआयसीच्या या पॉलिसीबाबत विचार करू शकता.

आजच्या काळात, बहुतांश लोक विमा पॉलिसी घेतात. अशा परिस्थितीत तुम्ही अशा ठिकामी गुंतवणूक करावी जिथून तुम्हाला चांगला परतावा मिळू शकेल. पेन्शनबाबत तुम्ही तणावात राहत असाल तर आजच्या काळात अशा अनेक योजना येत आहेत.

अशा अनेक योजना आहेत ज्यात तुम्ही गुंतवणूक करून दरमहा 20 हजार रुपये मिळवू शकता. आम्ही LIC च्या लाइफ सेव्हिंग पॉलिसीबद्दल बोलत आहोत. येथे तुम्ही एकदा गुंतवणूक करून दरमहा 20 हजार रुपये पेन्शन मिळवू शकता. जाणून घेऊया कोणती आहे ही पॉलिसी.

भारतीय आयुर्विमा महामंडळाची (LIC) अर्थात एलआयसीची पॉलिसी गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम मानली जाते कारण ती सरकारी विमा कंपनी आहे. आज बहुतांश लोकांचा कल विमा घेण्याकडे असतो. अशा परिस्थितीत, तुम्हाला एलआयसीच्या लाइफ सेव्हिंग पॉलिसीबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. या पॉलिसीमध्ये, तुम्हाला एकदा प्रीमियम जमा करावा लागेल, त्यानंतर दरमहा पेन्शनची हमी दिली जाईल.

ही पॉलिसी घेणार्‍या व्यक्तीचे वय 75 वर्षे असेल तर त्याला 40 लाख 72 हजार रुपये गुंतवावे लागतील. त्यानंतर त्यांना दरमहा 20 हजार रुपये पेन्शन दिली जाईल. तुम्ही 6 लाख 10 हजार 800 रुपयांचा प्रीमिअम घेतल्यास, या प्लॅनवर त्यांना 6 लाख रुपयांची विमा रक्कम मिळेल. अशा परिस्थितीत तुम्हाला वर्षभरासाठी 76 हजार 650 रुपये पेन्शन दिले जाईल.

ही पेन्शन दरमहा घ्यायची असेल तर 6 हजार रुपये मिळतील. सहामाही पेन्शन सुमारे 37 हजार रुपये असेल. एलआयसीच्या जीवन अक्षय योजनेत वर्षभरासाठी किमान 12 हजार पेन्शन उपलब्ध आहे. ही पेन्शन गुंतवणूकदाराला मृत्यूपर्यंत उपलब्ध असते.

जर तुम्ही ही पॉलिसी खरेदी केली तर तुम्हाला अनेक फायदे मिळणार आहेत. जर तुम्हाला अचानक कर्जाची गरज भासली तर तुम्ही हा प्लॅन खरेदी केल्यानंतर 90 दिवसांनंतर कर्ज देखील घेऊ शकता. तुम्ही या पॉलिसीमध्ये तुम्हाला हवी तितकी गुंतवणूक करू शकता म्हणजेच यामध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा निश्चित केलेली नाही. मात्र, हा प्लॅन खरेदी करण्यासाठी किमान 1 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.