रांगेत उभे राहू नका! पोस्ट ऑफिसमध्ये जा आणि कागदपत्रांशिवाय मिनिटांत नंबर अपडेट करा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 11:43 IST2025-11-18T11:18:26+5:302025-11-18T11:43:05+5:30
Update Mobile Number in Aadhaar : आजच्या काळात आधार कार्ड हे सर्वात महत्त्वाचे आणि अनिवार्य कागदपत्र आहे. तिकीट बुकिंगपासून ते बँकिंगपर्यंत अनेक छोट्या-मोठ्या कामांसाठी आधार कार्डचा वापर केला जातो. त्यामुळे आधार कार्डवरील माहिती अद्ययावत असणे खूप महत्त्वाचे आहे, विशेषतः तुमचा मोबाईल नंबर.

साधारणपणे मोबाईल नंबर बदलण्यासाठी आधार केंद्रावर जावे लागते, पण आता इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने ही प्रक्रिया खूप सोपी केली आहे. रांगेत उभे न राहता आधार कार्डमधील मोबाईल नंबर बदलता येणार आहे.

आधार कार्डमध्ये मोबाईल नंबर बदलण्यासाठी आता इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने (IPPB) एक अत्यंत सोपी आणि वेगळी पद्धत उपलब्ध केली आहे. यासाठी तुम्हाला आधार केंद्राच्या लांब रांगेत उभे राहण्याची गरज नाही.

IPPB च्या माध्यमातून तुम्ही केवळ एका बायोमेट्रिक फिंगरप्रिंटच्या मदतीने तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डमध्ये बदलू शकता. ही प्रक्रिया अत्यंत सुरक्षित आणि वेळेची बचत करणारी आहे.

आधार कार्डमध्ये नंबर अपडेट करण्यासाठी तुम्हाला तुमच्या घराजवळील कोणत्याही IPPB शाखेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागेल. पोस्ट ऑफिस आता आधार-संबंधित सेवांसाठी एक महत्त्वाचे केंद्र बनले आहे.

पोस्ट ऑफिसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आणि तुम्हाला आधारमध्ये जोडायचा असलेला नवीन मोबाईल नंबर तेथील कर्मचाऱ्याला सांगावा लागेल.

नंबर आणि आधार क्रमांक सांगितल्यानंतर, कर्मचारी तुमच्या फिंगरप्रिंट बायोमेट्रिकद्वारे तुमची पडताळणी करेल. याच पडताळणीमुळे कोणतीही कागदपत्रे जमा करण्याची आवश्यकता भासत नाही.

बायोमेट्रिक पडताळणी यशस्वी झाल्यानंतर काही वेळातच तुमचा नवीन मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डमध्ये अद्ययावत केला जाईल. ही प्रक्रिया अतिशय जलद असल्याने तुमचा वेळ वाचतो.

या प्रक्रियेमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचे दस्तावेज किंवा कागदपत्रे सोबत घेऊन जाण्याची किंवा जमा करण्याची गरज नसते. यामुळे जुन्या पद्धतीप्रमाणे कागदपत्रे जमा करण्याची कटकट संपली आहे.

जर तुम्ही आधार केंद्रातून नंबर बदलण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला आधी अपॉइंटमेंट घ्यावी लागते. IPPB च्या सोयीमुळे तुम्हाला अपॉइंटमेंट शेड्यूल करण्याची गरज पडत नाही.
















