खुशखबर! सणांपूर्वी सोनं-चांदी स्वस्त झालं; फटाफट चेक करा आजचे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 12:54 PM2023-10-31T12:54:37+5:302023-10-31T12:58:07+5:30

इस्त्रायल आणि हमास युद्धामुळे सोन्या-चांदीचे दर वाढले आहेत.

गेल्या काही दिवसापासून इस्त्रायल आणि हमास युद्धामुळे सोन्या-चांदीच्या दरात वाढ सुरू होती. आता सणांच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीचे दर कमी झाले आहेत.

करवा चौथच्या एक दिवस आधी, फ्युचर्स मार्केटमध्ये सोने आणि चांदी दोन्ही स्वस्त झाले आहेत. मंगळवार, 31 ऑक्टोबर 2023 रोजी, मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव घसरत आहे.

करवा चौथनंतर, लोक धनत्रयोदशी, दिवाळी आणि भाऊ बीजच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी करतात, त्यामुळे ते कमी सोन्याच्या किमतीचा फायदा घेऊ शकतात.

सुरुवातीपासून सोनं 61,117 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या व्यवहारावर सुरू झाला. यानंतर याच्या किंमतीत बदल झाला. यात 130 रुपयांची घसरण झाली. सोमवारी सोने 61,020 रुपयांवर बंद झाले होते.

सोन्याव्यतिरिक्त आज चांदीमध्येही घसरण दिसून येत आहे. फ्युचर्स मार्केटमध्ये, चांदी कालच्या तुलनेत 31 ऑक्टोबरला 72,489 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या तुलनेत 266 रुपयांनी म्हणजेच 0.37 टक्क्यांनी स्वस्त होत आहे. सोमवारी चांदी 72,223 रुपये प्रति किलोवर बंद झाली.

नवी दिल्ली- 24 कॅरेट सोने 62,000 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 75,300 रुपये प्रति किलो, तर चेन्नईत 24 कॅरेट सोने 62,350 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 78,200 रुपये प्रति किलो रुपयांनी आह आणि मुंबईत 24 कॅरेट सोने 61,850 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 75,300 रुपये प्रति किलो

कोलकाता- 24 कॅरेट सोने 61,850 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 75,300 रुपये प्रति किलो तर गाझियाबाद- 24 कॅरेट सोने 62,000 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 75,300 रुपये प्रति किलो

गुरुग्राम- 24 कॅरेट सोने 62,000 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 75,300 रुपये प्रति किलो. नोएडामध्ये 24 कॅरेट सोने 62,000 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 75,300 रुपये प्रति किलो. जयपूरमध्ये 24 कॅरेट सोने 62,000 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 75,300 रुपये प्रति किलो लखनौ- 24 कॅरेट सोने 62,000 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 75,300 रुपये प्रति किलो.

पाटणा- 24 कॅरेट सोने 61,900 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 75,300 रुपये प्रति किलो.

देशांतर्गत बाजाराशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. धातूच्या अहवालानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 0.08 टक्क्यांच्या घसरणीसह 1,994.80 डॉलर प्रति औंस पातळीवर व्यवहार करत आहे.

देशांतर्गत बाजाराप्रमाणेच चांदीचे दर वाढले आहेत. कालच्या तुलनेत चांदी 0.46 टक्क्यांनी घसरून प्रति औंस 23.288 डॉलरवर कायम आहे.