सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या किंमती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 02:26 PM2023-07-31T14:26:20+5:302023-07-31T14:29:48+5:30

सोमवारी सोन्या-चांदीच्या देशांतर्गत वायदा किमतीत घसरण झाली आहे.

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोमवारी, आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी, सोने आणि चांदीच्या किमतीत (Gold Silver Rate) घसरण झाली आहे.

देशांतर्गत वायदे बाजारातही आज सोन्याचा घसरणीसह व्यवहार दिसून आला. 5 ऑक्टोबर 2023 रोजी, MCX एक्सचेंजवर सोने सोमवारी सकाळी 0.23 टक्क्यांनी किंवा 140 रुपयांनी कमी होऊन 59645 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करताना दिसले.

गुरुवारी अमेरिकेच्या जीडीपीचे भक्कम आकडे समोर आले. यामुळे यूएस फेडला मुख्य व्याजदर आणखी 0.25 टक्क्यांनी वाढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात घसरण होत आहे.

सोन्याबरोबरच सोमवारी देशांतर्गत वायदे बाजारातही चांदीच्या दरात घसरण दिसून आली. MCX वर 5 सप्टेंबर 2023 रोजी डिलिव्हरीसाठी चांदीचा भाव 0.25 टक्क्यांनी किंवा 184 रुपयांनी घसरून 73875 रुपये प्रति किलोवर व्यापार झाला.

सोमवारी सकाळी जागतिक सोन्याच्या दरातही घसरण दिसून आली.

कॉमेक्सवर सोन्याची जागतिक वायदा किंमत 0.41 टक्क्यांनी किंवा 8.30 डॉलरने घसरून 1991.60 प्रति औंस डॉलर झाली.

सोन्याची जागतिक स्पॉट किंमत सध्या 1954.59 प्रति औंस डॉलर, 0.25 टक्क्यांनी कमी किंवा 4.90 डॉलरवर व्यापार करत आहे.

सोमवारी सकाळी चांदीच्या जागतिक किमतीतही घसरण दिसून आली. कॉमेक्सवर, चांदीची फ्युचर्स किंमत 0.53 टक्क्यांनी किंवा 0.13 डॉलरने घसरून 24.37 डॉलर प्रति औंस झाली.

चांदीची जागतिक स्पॉट किंमत 0.42 टक्‍क्‍यांनी किंवा 0.10 डॉलरने घसरून 24.24 डॉलर प्रति औंस झाली.