सोन्याच्या किमतीचा नवा विक्रम! १० ग्रॅमसाठी तुमच्या शहरातील नवीन दर जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 14:48 IST2025-04-18T14:38:45+5:302025-04-18T14:48:33+5:30

Gold Prices Today: सोन्याने गेल्या वर्षभरात परतावा देण्याच्या बाबतीत म्युच्युअल फंडांना मागे टाकलं आहे. आता तो दिवस दूर नाही, ज्यादिवशी सोने १ लाख रुपयांना तोळा असेल.

एकीकडे रशिया-युक्रेन युद्ध तर दुसरीकडे अमेरिका आणि चीनमधील व्यापारी तणाव, यामुळे जगभरात अनिश्चितेचं वातावरण निर्माण झालं आहे. मात्र, म्हणतात ना.. एकाचं नुकसान दुसऱ्याचा फायदा असू शकतो.

भारतीय शेअर बाजार सध्या हेलकावे खात आहे. अशा परिस्थितीत सोनं मात्र रोज नवीन भाव खात आहे. फक्त गुंतवणूकदारच नाही तर आता मोठमोठे देशही पिवळ्या धातूचा साठा वाढवत आहेत.

अशात सोन्याची किंमत रोज नवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. हे असेच सुरू राहिले तर तो दिवस दूर नाही, जेव्हा १० ग्रॅम सोन्यासाठी एक लाख रुपये मोजावे लागतील.

मुंबईत १० ग्रॅम सोने ९५,२४० रुपयांना विकले जात आहे. तर चांदीचा दर ९५,२४० रुपये प्रति किलो आहे. त्याचप्रमाणे चेन्नईमध्ये सोन्याचा भाव ९५,५२० रुपये आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९५,०८० रुपयांवर आहे.

जर आपण कोलकात्याबद्दल बोललो तर, येथे प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत ९५,११० रुपये आहे. हैदराबादमध्ये ते ९५,३९० रुपये आणि बेंगळुरूमध्ये ९५,३१० रुपयांना विकले जात आहे.

त्याआधी, गुरुवारी, जागतिक स्तरावरील मागणीत राष्ट्रीय राजधानीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव ७० रुपयांनी वाढून ९८,१७० रुपये प्रति १० ग्रॅम या नवीन विक्रमी उच्चांकावर पोहोचला. तर बुधवारी ९९.९ टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव १,६५० रुपयांनी वाढून ९८,१०० रुपये प्रति १० ग्रॅम या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला.