शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gold Price Today: खुशखबर! सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीही स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 5:10 PM

1 / 6
सोने खरेदी करणारांसाठी आनंदाची बातमी आहे. जर आपणही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आज सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोने आणि चांदी या दोन्ही धातूंच्या किमती घसरल्या आहेत. आज सोन्याचा भाव 59,000 रुपयांवर क्लोज झाला आहे.
2 / 6
सोन्याच्या किंमतीत घसरण - आज MCX वर सोन्याच्या दरात घसरण दिसून येत आहे. आज सोन्याचा भाव 0.44 टक्क्यांनी घसरून 59010 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत आहे.
3 / 6
चांदीही स्वस्त - याशिवाय, चांदीचा भावही 0.31 टक्क्यांच्या घसरणीसह 70192 रुपये प्रति किलोग्रॅमवर आला आहे. आज चांदीच्या किंमतीतही घसरण दिसून येत आहे.
4 / 6
गेल्या आठवड्यात 1200 हून अधिक महागले सोने - गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात तब्बल 1200 रुपयांनी वाढ झाली आहे. तर दुसरीकडे, जागतिक बाजारासंदर्भात बोलायचे झाल्यास, जागतिक बाजारातही सोन्याच्या दरात तेजी दिसून येत आहे.
5 / 6
लक्षात असू द्या ही महत्वाची गोष्ट - जर आपण सोनं खरेदीसाठी बाजारात जात असाल तर हॉलमार्क बघूनच सोनं खरेदी करा. सोन्याची शुद्धता चेक करण्यासाठी आपण सरकारी अॅपचाही वापर करू शकता. ‘BIS Care app’ च्या माध्यमाने आपण सोन्याची शुद्धता चेक करू शकता. याशिवाय याच अॅपच्या माध्यमाने आपण तक्रारही करू शकता.
6 / 6
येथे चेक करा दर - आपण घरबसल्याही सोन्याचा दर चेक करू शकतात. इंडियन बुलियन अँड ज्वैलर्स असोसिएशननुसार आपण केवळ 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन दर जाऊन घेऊ शकतात. आपण ज्या क्रमांकावरून मेसेज करता त्याच क्रमांकावर आपल्याला मैसेज येईल.
टॅग्स :GoldसोनंSilverचांदीMarketबाजार