Gold Price Today: आनंदाची बातमी! सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण, फटाफट चेक करा लेटेस्ट रेट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 01:36 PM2023-04-28T13:36:49+5:302023-04-28T13:59:18+5:30

Gold Price Today: चांदीच्या दरात आज मोठी घसरण झाल्याचे दिसत आहे.

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही दिवसापासून सोनं-चांदीचे दर स्थिर होते, पण आता या दरात घसरण झाल्याचे समोर आले आहे.

सराफा बाजारात पुन्हा एकदा सोन्याचे दर घसरले आहेत. पण, आज चांदीची धामधूम काल दिसली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा दर घसरला आहे, तर चांदीचा दर वाढला आहे.

सराफा बाजारात दोन्ही मौल्यवान धातूंचे दर घसरत आहेत. येत्या काळात सोने ६५,००० च्या पुढे जाऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. फेब्रुवारी महिन्यात सोने ५५,००० रुपयांपर्यंत घसरले. मात्र त्यानंतर सोन्याच्या किमतीत चढ-उतार होत आहेत.

सोन्याच्या वाढीबरोबरच चांदीच्या दरातही वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. काही महिन्यांत चांदी ८०,००० रुपयांपर्यंत जाऊ शकते, असा अंदाज आहे.

मल्टी-कमोडिटी एक्सचेंजवर शुक्रवारी सोने आणि चांदीच्या दरांमध्ये संमिश्र कल दिसून आला.

शुक्रवारी दुपारी सोन्याचा भाव ६१ रुपयांनी घसरून ५९८४० रुपये प्रति १० ग्रॅम तर चांदीचा भाव ४९ रुपयांनी वाढून ७५३२९ रुपये प्रति किलोवर होता. याआधी गुरुवारी सोने ५९९०१ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदी ७५२८० रुपयांवर बंद झाली होती.

इंडिया बुलियन्स असोसिएशनद्वारे सराफा बाजार दर दररोज जारी केले जातात. शुक्रवारी २४ कॅरेट सोन्याचा भाव सुमारे ३५० रुपयांनी घसरून ६०१६९ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला.

चांदीच्या दरातही घसरण दिसून आली आणि तो प्रति किलो ५०० रुपयांनी घसरून ७३९३४ रुपये प्रति किलोवर पोहोचला. त्याच दिवशी २३ कॅरेट सोन्याचा भाव ५९९२८ रुपये, २२ कॅरेट सोन्याचा भाव ५५११५ रुपये आणि २० कॅरेट सोन्याचा भाव ४५१२७ रुपये प्रति १० ग्रॅम झाला.

चेन्नईमध्ये सोन्याचा दर ६१३१० रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. मुंबईत सोन्याचा दर ६०८२० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. नवी दिल्लीत सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम ६०९७० रुपये आहे. कोलकातामध्ये सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ६०८२० रुपये एवढा दर २४ कॅरेट सोन्याचा आहे.

तर २२ कॅरेट सोन्याचा भावही घसरला आहे. चेन्नईमध्ये सोन्याचा दर ५६२०० रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. तर मुंबईत सोन्याचा दर ५५७५० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.

नवी दिल्लीत ते सुमारे ५५९०० रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. कोलकात्यात सोन्याचा भाव ५५७५० रुपये प्रति १० ग्रॅमच्या पातळीवर आहे.