Post Office Investment Scheme: बँक FD विसरुन जाल! पोस्टाची ही स्कीम करेल मालामाल; २ लाख जमा केल्यास मिळेल ९० हजारांचं व्याज
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 09:13 IST2026-03-24T08:54:40+5:302026-03-24T09:13:10+5:30
Post Office Investment Scheme: केंद्र सरकारने मध्यमवर्गीयांसाठी बचत आणि गुंतवणूक करता यावी यासाठी अनेक सोप्या आणि सुरक्षित अल्पबचत योजना सुरू केल्या आहेत. या योजना सरकारी हमीसह चांगले व्याजदर देतात.

Post Office Investment Scheme: केंद्र सरकारने मध्यमवर्गीयांसाठी बचत आणि गुंतवणूक करता यावी यासाठी अनेक सोप्या आणि सुरक्षित अल्पबचत योजना सुरू केल्या आहेत. या योजना सोप्या असून, कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहेत आणि सरकारी हमीसह चांगले व्याजदर देतात. अनेक योजना ७% ते ८.२% पर्यंत व्याजदर देतात आणि काही योजनांवर ८० सी अंतर्गत कर सवतही मिळते.

निवृत्तीसाठी निधी उभारण्याकरिता, तसंच मुलांचं शिक्षण, विवाह किंवा घर खरेदी यांसारख्या प्रमुख आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी या योजना अत्यंत उत्कृष्ट आहेत. पोस्ट ऑफिस बचत खाती, आरडी (RDs), एफडी (FDs), एनएससी (NSCs), सुकन्या समृद्धी आणि पीपीएफ (PPFs) यांसारख्या बँकिंग सेवा देखील पुरवतं. ज्या सामान्य माणसासाठी अत्यंत विश्वासार्ह आणि फायदेशीर पर्याय ठरतात.

देशातील आघाडीच्या बँकांच्या तुलनेत, पोस्टाच्या काही योजना अधिक व्याजदर देतात. याच संदर्भात, आज आपण 'पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजने'चा (Fixed Deposit Scheme) आढावा घेणार आहोत. ही योजना बँकेच्या एफडी योजनेसारखीच आहे. या योजनेअंतर्गत, एका विशिष्ट कालावधीनंतर निश्चित व्याजदरासह गुंतवलेल्या संपूर्ण रकमेचा परतावा मिळण्याची हमी दिली जाते. केवळ ₹२ लाख जमा करून, तुम्ही ₹८९,९९० इतकं निश्चित व्याज मिळवू शकता.

पोस्टाच्या या योजनेत ७.५% पर्यंत व्याजदर दिलं जातं. पोस्ट ऑफिसमध्ये १ वर्ष, २ वर्षे, ३ वर्षे आणि ५ वर्षे अशा कालावधीसाठी एफडी खाती उघडता येतात. ही FD खाती 'टाइम डिपॉझिट' या नावानं उघडली जातात. पोस्टाचं TD खातं हे बँकेच्या FD खात्यासारखेच असतं; मुदत पूर्ण झाल्यावर, मूळ रक्कम आणि त्यावरील निश्चित दराचं व्याज अशी संपूर्ण रक्कम परत केली जाते.

पोस्टाच्या योजनांचे थेट लाभ भारत सरकारद्वारे दिले जातात; त्यामुळे, तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित असतात. पोस्ट ऑफिस एका वर्षाच्या बचत योजनेवर ६.९%, दोन वर्षांच्या बचत योजनेवर ७.०%, तीन वर्षांच्या बचत योजनेवर ७.१% आणि पाच वर्षांच्या बचत योजनेवर ७.५% व्याजदर देते.

जर तुम्ही या योजनेत ₹२ लाख जमा केले, तर तुम्हाला ₹८९,९९० इतके निश्चित व्याज मिळेल. जर एखाद्या व्यक्तीनं पोस्ट ऑफिसच्या ५ वर्षांच्या मुदत ठेव योजनेत (Fixed Deposit) ₹२,००,००० जमा केले, तर मुदतपूर्तीनंतर त्यांना ₹८९,९९० च्या निश्चित व्याजासह एकूण ₹२,८९,९९० मिळतील. सध्या, देशातील इतर कोणतीही बँक ५ वर्षांच्या मुदत ठेव योजनेवर ७.५ टक्के व्याजदर देत नाही.

दरम्यान, 'पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजने'अंतर्गत (Fixed Deposit Scheme), सर्व वयोगटांतील ग्राहकांना समान व्याजदर मिळतो. सामान्य नागरिकांच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिकांना ०.५० टक्के अधिक व्याज मिळतं. अनेक बँका ८० वर्षांहून अधिक वय असलेल्या ग्राहकांना अधिक व्याजदर देतात.

















