Business Idea : घरबसल्या 'हा' व्यवसाय सुरू केल्यास होईल बंपर कमाई, जाणून घ्या सविस्तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 10:36 AM2023-04-03T10:36:41+5:302023-04-03T10:43:54+5:30

Business Idea : हा व्यवसाय सुरू करण्यासाठी खूप कमी खर्च येतो.

नवी दिल्ली : जर तुम्ही घरबसल्या स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला अशा व्यवसायाबद्दल सांगत आहोत, ज्याची मागणी कधीही कमी होत नाही. तुम्ही वर्षभर सतत कमाई करत राहाल. तसेच, हा व्यवसाय सुरू करण्यासाठी खूप कमी खर्च येतो.

दरम्यान, हा व्यवसाय म्हणजे लापशी बनवण्याचा आहे. तुम्ही तुमच्या घरी छोट्या जागेत लापशी बनवण्यासाठी युनिट सेट करू शकता. जर तुम्ही हे युनिट बसवून व्यवसाय सुरू केलात, तर तुम्हाला त्यातून प्रचंड कमाई होईल. लापशी अशी वस्तू आहे, जी बाजारात सहज विकली जाईल.

सध्या मोठ्या शहरांपासून खेड्यापर्यंत सर्वत्र लापशीची मागणी वाढत आहे. लोक आता आरोग्याबाबत जागरूक होत आहेत आणि सेंद्रिय अन्न खाण्याकडे अधिक लक्ष देत आहेत. अशा परिस्थितीत, बरेच लोक सकाळच्या नाश्त्याला प्रोटीनयुक्त बनवण्यासाठी गव्हाच्या लापशीचा वापर करतात.

गव्हामध्ये कार्बोहायड्रेट्ससोबत काही प्रमाणात प्रोटीन देखील असते, जे मानवी शरीरासाठी एक आवश्यक घटक आहे. तसेच, लापशी हा एक झटपट होणारा नाश्ता आहे. त्यामुळे लोकांची मागणी वाढली आहे.

लापशी बनवण्याची प्रक्रिया देखील खूप सोपी आहे. यासाठी सर्वात आधी गहू धुऊन स्वच्छ केला जातो. यानंतर ते मऊ होण्यासाठी 5-6 तास पाण्यात सोडले जाते. अंकुर फुटल्यानंतर गहू उन्हात वाळवला जातो. यानंतर लापशी पिठाच्या गिरणीत बारीक करून तयार केली जाते.

हा व्यवसाय तुम्ही छोट्या प्रमाणावर सुरू केल्यास फारसा खर्च येत नाही. तसेच तुम्हाला या व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणावर 1-2 लाख रुपये खर्च करावे लागतील. जर तुम्ही तुमच्या घरी एक छोटेसे युनिट उभारून लापशीचा बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकता.

तुम्ही एकदा व्यवसाय सुरु केला तर त्याच्या उत्पादनापासून ते मार्केटिंग आणि विक्रीपर्यंत सर्व काही स्वतः करू शकता. यामध्ये तुम्हाला कोणताही हिस्सा देण्याची गरज नाही. दुसरीकडे, हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू केल्यास या सर्व कामांसाठी मजुरांची गरज भासणार आहे. तसेच, जास्त उत्पादनामुळे तुमचा नफा देखील वाढेल. अशा प्रकारे तुम्ही या व्यवसायातून मोठी कमाई करू शकता.