BSNL कडूनही मोफत सेवेची घोषणा; मिळणार १०० मिनिटं कॉलिंग आणि अतिरिक्त व्हॅलिडिटी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 03:26 PM2021-05-20T15:26:40+5:302021-05-20T15:38:35+5:30

BSNL : पाहा का घेतलाय कंपनीनं हा निर्णय आणि कोणते मिळणार बेनिफिट्स

कोरोना महासाथीदरम्यान रिलायन्स जिओ (Reliance Jio), एअरटेल (Airtel), व्होडाफोन-आयडिया (Vodafone-Idea) यांसारख्या कंपन्यानी आपल्या ग्राहकांना दिलासा देत ठराविक कालावधीसाठी मोफत सेवेची घोषणा केली होती.

रिलायन्स जिओनं सर्वप्रथम आपल्या जिओ फोन युझर्ससाठी कोरोना काळात ३०० मिनिटं मोफत देण्याचा निर्णय घेतला होता. ग्राहकांना दररोज १० मिनिटं या हिशोबानं त्यांना ही ३०० मिनिटं वापरता येणार आहेत.

यानंतर सरकारी दूरसंचार कंपनी BSNL नं आपल्या ग्राहकांसाठी मोठी घोषणा केली आहे. बीएसएनएल आपल्या सर्व प्रभावित ग्राहकांना व्हॅलिडिटी वाढवून आणि १०० मिनिटं मोफत कॉलिंगची सुविधा देणार आहे.

कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार ग्राहकांच्या प्लॅन व्हाऊचर्सची व्हॅलिडिटी ३१ मे पर्यंत वाढवली जाणार आहे. जेणेकरून ग्राहकांना फोन येण्यात किंवा फोन करण्यात कोणत्याही प्रकारची समस्या जाणवणार नाही.

कंपनी त्या सर्व ग्राहकांना मोफत व्हॅलिडिटी वाढवून देणार आहे. ज्यांची वैधता १ एप्रिल रोजी संपली आहे. प्लॅन व्हाऊचर्सची व्हॅलिडिटी ३१ मे पर्यंत वाढवली जाईल.

ईटी टेलिकॉमनं दिलेल्या वृत्तानुसार कंपनीनं यामध्ये १०७, १९७ आणि ३९७ रूपयांच्या प्लॅन व्हाऊचर्सचाही समावेश केला आहे.

१०७ रूपयांच्या प्लॅनमध्ये १०० मिनिटं, १०० दिवसांची व्हॅलिडिटी आणि ३ जीबी डेटा मिळतो. यासह पहिल्या ६० दिवसांसाठी बीएसएनएल ट्यून्सही मिळतात.

१९७ रूपयांच्या प्लॅनमध्ये १८० दिवसांची व्हॅलिडिटी आणि दररोज २ जीबी डेटा मिळतो. याशिवाय ग्राहकांना अनिलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस पाठवण्याची सुविधाही मिळते.

३९७ रूपयांच्या प्लॅनची व्हॅलिडीटी ३६५ दिवसांची असून त्यामध्येही दररोज २ जीबी डेटा देण्यात येतो. तसंच या प्लॅनसह ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस पाठवण्याची सुविधाही मिळते.

कंपनी या कठीण काळात आपल्या ग्राहकांना सेवा देण्यासाऑी कटिबद्ध आहे. ग्राहकांनी आपला नंबर रिचार्ज करण्यासाठी डिजिटल माध्यमाचा वापर करावा, असं आवाहन कंपनीचं अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रविण कुमार पुरवार यांनी केलं.

Read in English