Billionaires Net worth: कमाईत अंबानी-अडानी सूसाट..! इलॉन मस्क यांचा 726570 कोटींचा घाटा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 03:14 PM2022-11-18T15:14:45+5:302022-11-18T15:23:20+5:30

Billionaires Net worth: इलॉन मस्क यांच्यासह जगातील अनेक दिग्गजांच्या संपत्तीत मोठी घट झाली आहे.

Bloomberg Billionaire Index Report : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अडानी (Gautam Adani) या वर्षी कमाई करण्याच्या बाबतीत सर्वात पुढे आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार या वर्षी त्यांच्या कमाईने रॉकेटची स्पीड पकडली आहे. या वर्षी अडानींची नेटवर्थ 56.4 अब्ज डॉलर्सने वाढली असून, आता 133 अब्ज डॉलर्सवर आहे. जगात सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत, ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

विशेष म्हणजे, जगातील टॉप 10 श्रीमंतांमध्ये फक्त अडानी आणि रिलायंस इंडस्ट्रीज (Reliance Industries) चे चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्याच संपत्तीमध्ये वाढ झाली आङे. इतर सर्व श्रीमंतांच्या कमाईथ मोठी घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

संपत्ती गमावणाऱ्यांमध्ये टॉपवर टेस्ला (Tesla) आणि स्पेसएक्स (SpaceX) चे सीईओ इलॉन मस्क (Elon Musk) नंबर एकवर आहेत. मस्क यांच्या एकूण नेटवर्थमध्ये आतापर्यंत 89.7 अब्ज डॉलरची घट झाली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांची नेटवर्थ 335 अब्ज डॉलरवर पोहोचली होती.

या लिस्टमध्ये दुसरे नाव मेटा (फेसबूकची पॅरेंट कंपनी) चे सीईओ मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांचे आहे. त्यांच्या एकूण संपत्तीत आतापर्यंत 82.9 अब्ज डॉलरची घट झाली आहे. अॅमेझॉन (Amazon) चे फाउंडर जेफ बेजोस (Jeff Bezos) यांच्या संपत्तीत 74.3 अब्ज डॉलर्सची घट झाली आहे.

श्रीमंतांच्या यादीत इलॉन मस्क 181 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह टॉपवर आहेत. गुरुवारी त्यांच्या संपत्तीत 2.59 अब्ज डॉलरची घट झाली. फ्रांसचे उद्योगपती बर्नार्ड आरनॉल्ट (Bernard Arnault) 157 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह दुसऱ्या स्थानावर आहेत. बेजोस यांच्या संपत्तीत गुरुवारी 2.26 अब्ज डॉलर्सची घट झाली.

या वर्षी बिल गेट्स (Bill Gates) यांची संपत्ती 25.3 अब्ज डॉलर्स, वॉरेन बफेट (Warren Buffett) यांच्या संपत्तीत 1.61 अब्ज डॉलर्स, लॅरी एलिसन (Larry Ellison) यांच्या संपत्तीत 14.3 अब्ज डॉलर, लॅरी पेज (Larry Page) यांच्या संपत्तीत 37.6 अब्ज डॉलर्स आणि सर्गेई ब्रिन (Sergey Brin) यांच्या संपत्तीत 36.5 अब्ज डॉलर्सची घट झाली आहे.

दुसरीकडे भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत 10.4 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. 90.1 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह ते यादीत 9व्या स्थानावर आहेत. कधीकाळी तिसऱ्या स्थानावर राहणारे मार्क झुकरबर्ग 42.5 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह या यादीत 27व्या नंबरवर गेले आहेत.