महासेल येतोय...पाहा 15 हजारांत कोणता फ्रिज घेऊ शकता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 13:32 IST2018-10-04T13:24:59+5:302018-10-04T13:32:10+5:30

येत्या काही दिवसांत ऑनलाईन आऊटलेटवर मोठे सेल लागणार आहेत. उकाडाही सुरु होत आहे. अशात कोणता फ्रिज घेऊ, असा प्रश्न पडला असलेच...15 हजारात कोण कोणते फ्रिज येतील. चला पाहुया...

व्हर्लपूल या कंपनीचा 215 लीटरचा फ्रिज तुम्हाला 14999 रुपयांत मिळू शकतो. हा चार रंगांमध्ये येतो. तसेच इएमआयवर घेतल्यास हा फ्रिज तुम्हाला 1667 रुपयांना महिना खरेदी करता येईल तसेच पहिल्यांदाच तुम्ही मास्टरकार्डने खरेदी करत असाल तर तुम्हाला 10 टक्क्यांची सूट मिळणार आहे. वीज वाचविण्यासाठी ये फ्रिजला 4 स्टार मिळाले आहेत.

एलजी या कंपनीचा हा 190 लीटरचा फ्रिज आहे. 1 वर्षाची वॉरंटी आणि कॉम्प्रेसरला 10 वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे. या फ्रिजची किंमत 14399 रुपये आहे. 3249 हजार रुपये जादा मोजून वॉरंटी 2 वर्षांसाठी वाढविता येते. याचे वजन 35 किलो आहे.

सॅमसंगच्या कंपनीचा हा 212 लीटरचा फ्रिज आहे. 14990 रुपयांना उपलब्ध असून यामध्ये डिजिटल कॉम्प्रेसर देण्यात आला आहे. यामुळे विजेचा वापर कमी आणि आवाजही कमी येतो.

व्हर्लपूल या कंपनीचा हा 15 हजारांत मिळणार हा दुसरा फ्रिज आहे. याची किंमत 13990 रुपये आहे. एकच दरवाजा असलेल्या या फ्रिजमध्ये 200 लीटरची जागा मिळते. कॉम्प्रेसरवर 10 वर्षांची वॉरंटी मिळते.

गोदरेजच्या या फ्रिजची किंमत 10 हजार रुपयांवर आहे. डिस्काउंटमध्ये ती आणखी कमी होईल. हा फ्रिज 185 लीटर क्षमतेचा असून कंपनी 1 वर्षाची वॉरंटी देते.