सावधान...! "फेब्रुवारी महिन्यात होणार इतिहासातील सर्वात मोठी शेअर बाजारातील घसरण"; कुणी केली भविष्यवाणी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 20:00 IST2025-01-27T19:54:18+5:302025-01-27T20:00:30+5:30

"इतिहासातील सर्वात मोठी शेअर बाजारातील घसरण फेब्रुवारी २०२५ मध्ये होईल", असे भाकित त्यांनी एका ट्विटमध्ये वर्तवले आहे...

शेअर बाजारासाठी हे वर्ष अद्याप तरी फारसे चांगले राहिलेले दिसत नाही. यावर्षात (२०२५ मध्ये) अद्याप केवळ १९ ट्रेडिंग दिवस झाले आहेत आणि यातील बहुतेक दिवसांमध्ये बाजारात मोठी घसरण दिसून आली आहे.

आज सोमवारच्या व्यवहारादरम्यानही बाजार ८०० हून अधिक अंकांनी घसरला. या घसरणीनंतर, आज एकाच दिवसात शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे सुमारे १० लाख कोटी रुपये स्वाहा झाले आहेत.

दरम्यान, आणखी एक भयावह बातमी समोर येत आहे. 'रिच डॅड पुअर डॅड' या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी शेअर बाजारासंदर्भात एक मोठी भविष्यवाणी केली आहे. "इतिहासातील सर्वात मोठी शेअर बाजारातील घसरण फेब्रुवारी २०२५ मध्ये होईल", असे भाकित त्यांनी एका ट्विटमध्ये वर्तवले आहे.

'या' गुंतवणूकदारांसाठी जबरदस्त संधी - कियोसाकी यांच्या मते, या अपेक्षित घसरणीमुळे ट्रेडिशनल इंव्हेस्टमेंट मार्केटमध्ये मोठा भूकंप येईल. यामुळे गुंतवणूकदारांना मोठा झटका बसेल. मात्र, जे गुंतवणूकदार क्विकली अॅक्ट करतात, त्यांच्यासाठी ही जबरदस्त संधी असेल.

क्रिप्टोकरन्सीमध्ये वाढ होणे अपेक्षित - रॉबर्ट कियोसाकी यांच्या मते, शेअर बाजारातील घसरण खरेदीची एक उत्तम संधी प्रदान करेल. बाजारातील घसरणीमुळे, कार आणि घरांसारखी संपत्ती स्वस्त होते. शेअर बाजार आणि बाँड बाजारांएवजी पर्यायी गुंतवणुकीकडे लक्ष केंद्रित होईल. अशा परिस्थितीत क्रिप्टोकरन्सीमध्ये जबरदस्त वाढ होणे अपेक्षित आहे.

यापूर्वीही केली आहे भविष्यवाणी - कियोसाकी यांनी 2013 मध्ये 'रिच डॅड्स प्रोफेसी' या आपल्या पुस्तकात प्रोक्सिमेट स्टॉक मार्केट क्रॅशचा इशारा दिला होता. आता त्यांच्या संबंधित सोशल मीडिया पोस्टवरून, ही भविष्यवाणी फेब्रुवारी 2025 मध्ये खरी ठरण्याच्या मार्गावर असल्याचे दिसत आहे.

महत्वाचे म्हणजे, कियोसाकी हे बाजारातील घसरणीकडे, एका चांगली संधी म्हणून बघत आहेत. अशा आर्थिक मंदीच्या काळात, वाहनांसह विविध मालमत्ता अधिक सुलभ होतात, असे त्यांचे म्हणणे आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)