जबरदस्त...! Paytm चा शेअर ₹1000 पार, 10 महिन्यांत 210% ने वाढला भाव; गुंतवणूकदारांना करतोय मालामाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 18:20 IST2024-12-16T18:12:01+5:302024-12-16T18:20:38+5:30
महत्वाचे म्हणजे, या शेअरने सोमावारी आपला 52 आठवड्यांचा उच्चांकही गाठला आहे....

पेटीएमची पॅरेंट कंपनी वन97 कम्युनिकेशन्सच्या शेअर्समध्ये चांगली तेजी दिसून येत आहे. पेटीएमच्या कंपनीचा शेअर सोमवारी 2 टक्क्यांची वधारून 1012.85 रुपयांवर पोहोचला. महत्वाचे म्हणजे, या शेअरने सोमावारी आपला 52 आठवड्यांचा उच्चांकही गाठला आहे.
हा शेअर 310 रुपयांच्या ऑल-टाइम लोच्या तुलनेत पेटीएमचा शेअर 3 पटीहूनही अधिकने वधारला आहे. पेटीएमची कंपनी वन97 कम्युनिकेशंसच्या शेअरमध्ये गेल्या 10 महिन्यांत 210 टक्क्यांहून अधिकची तेजी आली आहे.
पेटीएमची पॅरेंट कंपनी वन97 कम्युनिकेशन्सचा शेअर 9 मे 2024 रोजी 310 रुपयांच्या सर्वकालीन नीचांकी पातळीवर पोहोचला होते. तो आता 16 डिसेंबर 2024 रोजी 1012.85 रुपयांवर पोहोचला आहे.
पेटीएमचा शेअर सर्वकालीन नीचांकी पातळीवरून 3 पटींनी वाधारला आहे. हा शेअर 9 मे 2024 रोजी 310 रुपयांच्या पातळीवरून 220% हून अधिक वधारला आहे. मात्र, कंपनीचा शेअर सध्या 2150 रुपये या IPO किमतीच्या तुलनेत बराच खाली आहे.
10 महिन्यांत 210% ने वाधारला शेअर - गेल्या 10 महिन्यांचा विचार करता, पेटीएमच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. 15 फेब्रुवारी 2024 रोजी कंपनीचा शेअर 325.25 रुपयांवर होते. तो 16 डिसेंबर 2024 रोजी 1012.85 रुपयांवर पोहोचला आहे.
तसेच गेल्या 6 महिन्यांचा विचार करता, पेटीएमचा शेअर 143% ने वधारला आहे. 18 जून 2024 रोजी कंपनीचा शेअर 417.10 रुपयांवर होता. तो 16 डिसेंबर 2024 रोजी 1012.85 रुपयांवर पोहोचला आहे.
गेल्या 3 महिन्यांचा विचार करता, कंपनीचा शेअर जवळपास 50% ने वधारला आहे. तसेच गेल्या एका महिन्यात पेटीएमच्या पॅरेंट कंपनीचा शेअर 30% ने वधारला आहे.
पेटीएमची पॅरेंट कंपनी असलेल्या वन97 कम्युनिकेशन्सच्या IPO मध्ये शेअरची किंमत 2150 रुपये होती. कंपनीचा IPO 8 नोव्हेंबर 2021 रोजी गुंतवणुकीसाठी खुला झाला होता तो 10 नोव्हेंबरपर्यंत खुला होता.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)