वर्षभर SIM राहिल सुरू, ‘ही’ आहे Airtel ची सर्वात स्वस्त ऑफर; मिळणार डेटा, कॉलिंग, SMS

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 02:36 PM2022-08-20T14:36:23+5:302022-08-20T14:39:05+5:30

Airtel 365 Days Validity Plan: एअरटेल अनेक प्रकारचे रिचार्ज प्लॅन्स ऑफर करत आहे. जर तुम्हाला कमी किंमतीत अधिक वैधतेचा प्लॅन हवा असेल कर कंपनीकडे खास प्लॅन आहे.

Airtel 365 Days Validity Plan: सध्या सर्वच दूरसंचार कंपन्या आपल्याकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि असलेल्या ग्राहकांना टिकवून ठेवण्यासाठी अनेक निरनिराळे आणि आकर्षक प्लॅन्स आणत आहे. रिलायन्स जिओ, एअरटेल, व्होडाफोन आयडिया, बीएसएनएल या सर्वच कंपन्यांमध्ये सध्या स्पर्धा सुरू आहे.

सध्या अनेकजण ड्युअल सिमकार्ड असलेले फोन वापरतात. बहुतांश लोक दोन सिमकार्डही वापरतात. त्यामुळे दोन सिमकार्ड सुरू ठेवण्याचा खर्चही वाढतो. दोन्ही सिमकार्ड अॅक्टिव्ह ठेवणंही गरजेचं आहे. यासाठी अनेकदा युझर्स स्वस्त प्लॅन्सच्या शोधातही असतात.

दूरसंचार कंपन्या काही स्वस्त प्लॅन्सही ऑफर करतात. लाँग टर्म असलेल्या प्लॅन्सपासून स्वस्त आणि कमी वैधता असलेले असे अनेक प्लॅन्स कंपन्या ऑफर करतात. देशातील दुसऱ्या क्रमांकाची दूरसंचार कंपनी एअरटेलही असेच काही प्लॅन्स आपल्या ग्राहकांसाठी ऑफर करत आहे. कंपनी दीर्घ वैधता असलेले काही प्लॅन्स ऑफर करत आहे. जर तुम्ही स्वस्त आणि दीर्घ वैधता असलेल्या प्लॅन्सच्या सोधात असाल तर तुम्ही पुढील प्लॅन्स पाहून शकता.

कंपनी १७९९ रूपयांचा सर्वात स्वस्त दीर्घ वैधतेचा प्लॅन ऑफर करत आहे. याची वैधता ३६५ दिवसांची आहे. यामध्ये ग्राहकांना एकूण २४ जीबी डेटा देण्यात येतो. तसंच यासोबत अनलिमिटेड कॉलिंग आणि संपूर्ण वैधतेसाठी ३६०० एसएमएसही देण्यात येतील. याशिवाय अपोलो २४*७ सर्कलचं तीन महिन्यांचं सबक्रिप्शन, फास्टॅगवर १०० रूपयांचा कॅशबॅक, हॅलो ट्यून्स आणि विंक म्युझिकचं सबस्क्रिप्शनही देण्यात येतं

याशिवाय कंपनी अन्य दीर्घ वैधतेचे प्लॅन्सही ऑफर करते. यापैकी एक प्लॅन म्हणजे २९९९ रूपयांचा प्लॅन. यात ग्राहकांना दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएसचा लाभ देण्यात येतो. तर तिसरा प्लॅन ३३५९ रूपयांचा आहे. यात दररोज २.५ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएस ऑफर केले जातात. याशिवाय डिस्ने + हॉटस्टार मोबाईलचं एका वर्षाचं सबस्क्रिप्शन देण्यात येतं.