By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 12:48 IST
1 / 5Anant Ambani Luxury Watch: देशातील आघाडीच्या उद्योगपती कुटुंबांपैकी एक असलेल्या अंबानी कुटुंबाची लक्झरी लाइफस्टाइल नेहमीच चर्चेत असते. खासकरून अनंत अंबानी आपल्या लक्झरी घड्याळांच्या आवडीमुळे नेहमी चर्चेत येतात. आता पुन्हा एकदा अनंत यांची चर्चा होत आहे. याचे कारण म्हणजे, त्यांनी अलीकडेच Jacob & Co. ने खास तयार केलेली Opera Godfather Baguette “Shiva” ही घड्याळ घातली. या घड्याळाची किंमत सुमारे १२ कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.2 / 5आस्था आणि लक्झरीचा अनोखा मिलाफ- या घड्याळाची सर्वात खास बाब म्हणजे, त्यामध्ये भगवान शिवांची ध्यानस्थ अवस्थेतील हाताने कोरलेली सूक्ष्म मूर्ती आहे. मूर्तीभोवती ‘ॐ’ चे चिन्ह असून, घड्याळाला आध्यात्मिक स्पर्श मिळतो. १८ कॅरेट गोल्ड केसवर ३०० हून अधिक बॅगेट कट हिरे बसवलेले आहेत, ज्यामुळे ही घड्याळ अत्यंत आकर्षक आणि आलिशान दिसते. 3 / 5अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर- या घड्याळात ट्रिपल एक्सिस टूरबिलॉन सारखी अत्यंत गुंतागुंतीची यंत्रणा बसवण्यात आली आहे, जी गुरुत्वाकर्षणाचा परिणाम कमी करून वेळेची अचूकता टिकवून ठेवते. याशिवाय, या घड्याळात १२० नोट्सचा म्युझिक बॉक्स असून, तो प्रसिद्ध The Godfather चित्रपटाचे थीम म्युझिक वाजवतो. त्यामुळे ही घड्याळ केवळ पाहण्यापुरती मर्यादित नसून एक वेगळाच अनुभव देते.4 / 5६५८ सूक्ष्म भागांचा वापर- या खास घड्याळामध्ये एकूण ६५८ सूक्ष्म भाग आहेत. प्रत्येक भागाच्या समन्वयामुळे घड्याळातील शिवमूर्ती जिवंत भासते. यामुळे ही घड्याळ अभियांत्रिकी आणि कलाकुसरीचे उत्कृष्ट उदाहरण ठरते. तसेच, ही घड्याळ केवळ लक्झरी आयटम नसून, आस्था आणि वैभवाचा संगम म्हणून पाहिली जात आहे.5 / 5अनंत अंबानींचे लक्झरी वॉच कलेक्शन- अनंत अंबानी यांना घड्याळाची इतकी आवड आहे की, त्यांच्याकडील वॉच कलेक्शनची एकूण किंमत सुमारे २०० कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते. त्यांच्या कलेक्शनमध्ये Patek Philippe आणि Richard Mille सारख्या आंतरराष्ट्रीय ब्रँड्सचा समावेश आहे. त्यांच्या घड्याळांच्या निवडीत वैयक्तिक आवड आणि लक्झरीचा अनोखा संगम दिसून येतो.