7th Pay Commission: मोदी सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट! कर्मचारी होणार मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 04:48 PM2023-03-01T16:48:16+5:302023-03-01T16:51:11+5:30

7th Pay Commission: गेल्या काही महिन्यांपासून सरकारी कर्मचारी पगारवाढ आणि महागाई भत्त्याची वाट पाहत आहेत.

7th Pay Commission: गेल्या काही महिन्यांपासून सरकारी कर्मचारी पगारवाढ आणि महागाई भत्त्याची वाट पाहत आहेत, आज अखेर कर्नाटकमधील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारने आनंदाची बातमी दिली आहे.

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी होळीपूर्वी राज्यातील लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठी भेट दिली आहे. 'सरकारी कर्मचाऱ्यांना १७ टक्के पगारवाढ जाहीर केली आहे. ही वाढ १ एप्रिलपासून लागू होणार आहे, अशी घोषणा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

'अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करून नवीन पेन्शन योजना, आर्थिक बाबी आणि इतर राज्यातील इतर समस्यांचा अभ्यास करून सविस्तर अहवाल सादर केला जाईल, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

पगारवाढीसारख्या मागण्यांबाबत सरकारकडून आश्वासन मिळाल्यानंतर कर्नाटकातील सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप मागे घेतला आहे. याआधीही सरकार आणि कर्मचारी संघटना यांच्यात अनेक बैठका झाल्या, त्यात कोणताही निकाल लागला नाही.

सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी बुधवारी बेंगळुरू येथील ब्रुहत बेंगळुरू महानगरपालिका परिसरात निदर्शने केली.

सातव्या वेतन आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी, जुनी पेन्शन योजना पुनर्संचयित करणे आणि किमान 40 टक्के फिटमेंट सुविधा सुरू करणे यासह कर्मचाऱ्यांनी कर्नाटक सरकारसमोर 3 प्रमुख मागण्या मांडल्या होत्या.

नवीन पेन्शन योजना रद्द करण्याच्या आणि OPS परत आणण्याच्या त्यांच्या मागणीवर, सरकारने सांगितले की अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती त्याच्या व्यवहार्यतेचा अभ्यास करेल.

केंद्र सरकारही केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये लवकरच वाढ करणार आहे.