Job Crisis: २०२२ पर्यंत होऊ शकते IT क्षेत्रात ३० लाख कर्मचाऱ्यांची कपात; या प्रमुख कंपन्यांची तयारी

Published: June 17, 2021 03:21 PM2021-06-17T15:21:29+5:302021-06-17T15:29:06+5:30

IT Sector Jobs : काही प्रमुख कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार. कर्मचाऱ्यांची कपात करून IT कंपन्या वर्षाला १०० बिलियन डॉलर्सची बचत करण्याच्या तयारीत. पाहा काय आहे कारण.

कोरोनाच्या महासाथीमुळे यापूर्वीच अनेक क्षेत्रांवर मोठा परिणाम झाला होता. अशातच अनेक कर्मचाऱ्यांना वेतन कपात किंवा कामावरून कमी करण्यासारख्या प्रकारांना सामोरं जावं लागलं होतं.

परंतु येत्या काळात माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात (Information and Technology) क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवरही कर्मचारी कपातीची टांगती तलवार आहे.

Nasscom च्या अहवालानुसार देशांतील सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये १.६ कोटी कर्मचारी कार्यरत आहेत.

दरम्यान, कंपन्या २०२२ पर्यंत यातील ३० लाखांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची कपात करण्याच्या तयारीत आहेत, असंही यात नमूद करण्यात आलं आहे.

असं करून देशातील आयटी कंपन्या वर्षाला १०० बिलियन डॉलर्सची बचत करू इच्छित असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

Nasscom च्या रिपोर्टनुसार देशांतर्गत असलेल्या आयटी सेक्टमध्ये १.६ कोटी लोकं काम करत आहे. तसंच यापैकी जवळपास ९० लाख कर्मचारी हे लो स्किल्ड आणि BPO सेक्टरमध्ये नोकरी करत आहेत.

या ९० लाख लो स्किल्ड आणि बीपीओमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांमधून ३० लाख कर्मचारी २०२२ पर्यंत आपली नोकरी गमावू शकतात, असं अहवालाद्वारे सांगण्यात आलं आहे.

ऑटोमेशनचा सर्वाधिक परिणाम लो स्किल्ड लेबरवरच होईल, असंही त्यात नमूद करण्यात आलं आहे.

Nasscom च्या अहवालानुसार देशातील आयटी कंपन्यांपैकी TCS, Infosys, Wipro, HCL, Tech Mahindra आणि Cognizant सारख्या काही कंपन्या लवकरच ऑटोमेशनची प्रक्रिया सुरू करू शकतील.

आयटी क्षेत्रातील ऑटोमेशनमुळे ३० लाख कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याची योजना तयार करण्यात येऊ शकते.

तसंच भारत आधारित रिसोर्सेसवर वर्षाला २५ हजार डॉलर्स आणि अमेरिकनं रिसोर्सेसवर वर्षाला ५० हजार डॉलर्स खर्च करते, असा दावा या अहवालातून करण्यात आला आहे.

रिपोर्टनुसार स्किल डिसरप्शनचा सर्वाधिक परिणाम भारत आणि चीनवर पडेल. तर ASEAN, जपानवर याचा परिणाम कमी होऊ शकतो.

भारतासारख्या उद्योन्मुख बाजारपेठेत असलेल्या नोकऱ्यांमध्ये ऑटोमेशनमुळे सर्वाधिक धोका असतो.

भारत २००२ मध्ये उत्पादन क्षेत्रात टॉपवर होता. तर १९७० मध्ये जर्मनी आणि १९९० मध्ये मॅक्सिको होता.

दरम्यान, RPA चा सर्वात वाईट परिणाम हा अमेरिकेवर होऊ शकतो. बुधवारी बँक ऑफ अमेरिकानं जारी केलेल्या अहवालानुसार अमेरिकेतील १० लाख कर्मचाऱ्यांवर संकट आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Read in English