साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर महादेवांची अपार कृपा, बक्कळ लाभ; पदोन्नती योग, तुमची रास काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 15:50 IST2025-01-26T15:32:18+5:302025-01-26T15:50:05+5:30
Weekly Horoscope: - २६ जानेवारी २०२५ ते ०१ फेब्रुवारी २०२५ हा काळ तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य…

Weekly Horoscope: या सप्ताहात २७ जानेवारी रोजी शुक्र मीन राशीत जात आहे. अन्य कोणताही ग्रहपालट नाही. ग्रहस्थिती अशी हर्षल मेष राशीत, गुरू वृषभ राशीत, मंगळ कर्क राशीत, तर केतु कन्या राशीत आहे. रवी, बुध आणि प्लूटो मकर राशीत आहेत. शुक्र व शनी कुंभ राशीत असून, २७ रोजी शुक्र मीन राशीत जाईल. तेथे त्याची युती राहु आणि नेपच्यून यांच्याशी होईल. चंद्राचे भ्रमण वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीतून राहील.
सोमवारी प्रदोष, मासिक शिवरात्री आहे. बुधवारी दर्श अमावास्या आहे. शुक्रवारी धर्मनाथ बीज आहे. शनिवारी गणेश पंचमी, विनायक चतुर्थी (तीळ चतुर्थी) आहे. गुरुवारी सायंकाळी ६ वाजून ३६ मिनिटांपासून पंचक सुरू होत आहे. शुक्रवारी, शनिवारी पंचक आहे.
सोमवार, २७ जानेवारी रोजी प्रदोष आणि शिवरात्रीचा योग जुळून येत आहे. एकाच दिवशी प्रदोष आणि शिवरात्रीचा योग जुळून येणे विशेष मानले गेले आहे. ही दोन्ही व्रते महादेवांना समर्पित असल्याने तसेच सोमवारी आल्याने हा योग विशेष मानला जात आहे. एकूणच ग्रहस्थिती पाहता कोणत्या राशींवर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घेऊया...
मेष: हा आठवडा चांगला आहे. नोकरीत बदल करू इच्छित असाल तर त्यासाठी हा आठवडा प्रतिकूल आहे. आठवड्याच्या सुरवातीस आर्थिक चणचण भासू शकते. उत्तरार्धात समस्या दूर होऊ शकेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराशी भांडण होण्याची संभावना आहे. जे विद्यार्थी महाविद्यालय बदलू इच्छितात त्यांनी निर्णय घेण्यापूर्वी थोडा विचार करावा. व्यावसायिक विषयांचे अध्ययन करण्यासाठी प्रवेश घेऊ इच्छित असाल तर त्यासाठी आठवडा अनुकूल आहे. चांगली संधी मिळू शकते.
वृषभ: हा आठवडा चांगला आहे. नोकरी बदलावयाची असेल तर त्यासाठी आठवडा अनुकूल आहे. पदोन्नती संभवते. व्यापाऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल. वाहन किंवा घर खरेदी किंवा घराचे नूतनीकरण करण्यासाठी जास्तीचा पैसा खर्च करू शकता. प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी लागेल. एखाद्या चांगल्या डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावेत. प्रेमसंबंधात एखादा गैरसमज निर्माण होऊ शकतो, जो दूर करण्यासाठी स्पष्ट बोलून संवाद साधावा. वैवाहिक जीवनात वागणुकीमुळे व वाणीमुळे जोडीदाराशी आपले भांडण होण्याची शक्यता आहे.
मिथुन: हा आठवडा चांगला आहे. नोकरी बदलावयाची असेल तर त्यासाठी आठवडा अनुकूल आहे. हा आठवडा काहीसा खर्चिक आहे. फिरण्यात किंवा एखादी वस्तू खरेदी करण्यात जास्त पैसे खर्च करू शकता. ह्या आठवड्यात प्रकृती जरी चांगली राहिली तरी एखादा जुना आजार उफाळून येण्याची संभावना आहे. विद्यार्थी जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांनी आत्मविश्वास ढळू देऊ नये. प्रेमिकेशी संवाद साधताना वाणी गोड ठेवावी. अन्यथा संबंध बिघडू शकतात. विवाहितांना हा आठवडा चांगला आहे. जोडीदारासह एखाद्या ठिकाणी फिरावयास जाऊ शकता. त्यामुळे नात्यातील माधुर्य वाढू शकते.
कर्क: हा आठवडा चांगला आहे. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या योग्यतेवर आधारित चांगली संधी प्राप्त होऊ शकते. पदोन्नती संभवते. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. ह्या आठवड्यात काही नेत्र विकार संभवतात. अशा वेळी त्याकडे दुर्लक्ष करू नये. ह्या आठवड्यात एखाद्या प्रॉपर्टीत आर्थिक गुंतवणूक केली तर ती लाभदायी होऊ शकेल. ह्या आठवड्यात प्रेमिकेसह बाहेर फिरावयास जाऊ शकता. त्यामुळे एकटेपणा दूर होईल. विवाहित व्यक्ती त्यांच्या जोडीदाराच्या सहवासात सुखद क्षण घालवू शकतील. हा आठवडा ज्ञानवृद्धी व संशोधनासाठी उत्तम असल्याने विद्यार्थ्यांनी अमूल्य वेळ मित्रांच्या सहवासात सामाजिक माध्यमांवर वाया दवडू नये. योजनांना गती देण्यासाठी पर्याप्त तयारीस लागावे. ह्या आठवड्यात प्रलंबित किंवा थांबलेल्या कामांना गती येऊ शकते. ती यशस्वीपणे पूर्णत्वास नेऊ शकता. वैयक्तिक संबंधात काही कारणाने कटुता निर्माण झाली असेल तर ती दूर करण्यासाठी नात्यांना आवश्यक तितका वेळ द्यावा.
सिंह: हा आठवडा चांगला आहे. नोकरी करणाऱ्यांची कामगिरी उत्तम झाल्याने वरिष्ठ त्यांच्यावर खुश होतील. असे असले तरी कोणत्याही प्रकारच्या वादापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. ह्या आठवड्यात पगारवाढ होण्याची संभावना आहे. आरोग्य विषयक जुनाट आजारांकडे दुर्लक्ष केल्यास ह्या आठवड्यात समस्या वाढू शकतात. तेव्हा प्रकृतीकडे लक्ष द्यावे. ह्या आठवड्यात जर एखादी मोठी आर्थिक गुंतवणूक करावयाची असेल तर एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्यावा. विद्यार्थ्यांना एखाद्या परीक्षेस बसावयाचे असेल तर त्यांनी पूर्ण लक्ष तयारी करण्यावर केंद्रित करावे. ह्या आठवड्यात पूर्वीची प्रेमिका परतण्याची संभावना आहे. त्यामुळे नाते दुसऱ्यांदा जोडले जाऊ शकते. वैवाहिक जीवनात सर्व काही चांगलेच होईल. नात्यात समन्वय साधला गेल्याने मन प्रसन्न होईल.
कन्या: हा आठवडा चांगला आहे. ज्यांना सध्याची नोकरी सोडून दुसरी नोकरी करावयाची आहे त्यांच्यासाठी हा आठवडा चांगला आहे. व्यापाऱ्यांना परदेशी संबंधातून खूपच चांगला लाभ होऊ शकतो. जर जमिनीची खरेदी किंवा विक्री करावयाची असेल तर त्यासाठी आठवडा अनुकूल नसल्याने काही दिवस थांबावे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. परंतु, त्यांनी बहुमूल्य वेळ सामाजिक माध्यमांवर गप्पागोष्टी करण्यात वाया घालवू नये. अत्यंत खुश होऊन मित्रांना पार्टी देऊ शकाल. ह्याचा अर्थ असा नाही कीअति उत्साहित होऊन इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. अन्यथा कामे मध्येच खंडित होऊ शकते.
तूळ: हा आठवडा सामान्यच आहे. ज्या व्यक्ती नोकरीत परिवर्तन करू इच्छितात त्यांच्यासाठी हा आठवडा प्रतिकूल आहे. अशा वेळी सध्या जेथे नोकरी करत असतील तेथेच त्यांनी काही काळ नोकरी करत राहावी. त्याच प्रमाणे जर व्यापारी एखादे मोठे पाऊल उचलू पाहात असतील तर त्यांनी काही काळासाठी थांबावे. ह्या आठवड्यात अत्यंत उर्जावान व उत्साहित राहाल. असे असले तरी लहान-सहान गोष्टींवर विचार करत बसल्यास मानसिक आरोग्य बिघडू शकते. विद्यार्थ्यांसाठी आठवडा सामान्यच आहे. अति आत्मविश्वास त्यांना नकारात्मक परिणाम देऊ शकतो, ह्याची त्यांनी जाणीव ठेवावी. विशेषतः हा त्रास जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना होण्याची संभावना जास्त आहे. ह्या आठवड्यात घर किंवा वाहन खरेदीसाठी पैसा खर्च करू शकता. प्रणयी जीवन सुखद होईल. वैवाहिक जीवनात काही समस्या असल्याचे दिसू शकते. त्याचे निराकरण करण्यासाठी जोडीदारास थोडा वेळ देण्याची आवश्यकता भासेल.
वृश्चिक: हा आठवडा चांगला आहे. असे असले तरी ज्या व्यक्ती व्यापार करतात किंवा नवीन काही करू इच्छितात त्यांना काही काळासाठी शांत राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. ह्याचे कारण असे आहे कि ह्या आठवड्यात जी काही कामे कराल त्यात अपेक्षेनुसार परिणाम मिळणार नाही हे होय. नोकरी करणाऱ्यात विशेषतः आयटी क्षेत्र, फील्ड मार्केटिंग व बँकिंगशी संबंधित व्यक्तींसाठी आठवडा उत्तम आहे. ह्या आठवड्यात प्रकृतीकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, अन्यथा नंतर त्रास होऊ शकतो. तसे पाहिल्यास हा आठवडा खर्चाचा आहे. ह्या आठवड्यात कुटुंबासाठी भरपूर खर्च करावा लागू शकतो. ह्या व्यतिरिक्त वाहन खरेदीसाठी पैसा खर्च करू शकता. प्रणयी जीवनातील समन्वय टिकवून ठेवण्यासाठी प्रेमिकेस योग्य तितका वेळ द्यावा लागेल. वैवाहिक जीवनात गैरसमज संभवतात. अशा वेळी समोरा-समोर बसून प्रत्येक समस्येचे निराकरण करणे शहाणपणाचे ठरेल.
धनु: हा आठवडा सामान्यच आहे. व्यापारी नवीन योजनांची अंमल बजावणी करू शकतात. ह्या योजना यशस्वी झाल्याने मोठे सौदे करू शकाल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा आठवडा काहीसा तणावाचा असेल. अशा वेळी कार्यालयीन राजकारणापासून दूर राहावे. अन्यथा प्रतिमा मलीन होऊ शकते. मागील काही दिवसांपासून एखाद्या आजाराने त्रस्त झाला असलात तर ह्या आठवड्यात त्यातून सुटका होण्याची संभावना आहे. आर्थिक दृष्ट्या हा आठवडा सामान्य असल्याने कोणतीही मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करू नये. ह्या आठवड्यात वैवाहिक जोडीदाराच्या सहवासात सुखद क्षण घालवू शकाल.
मकर: हा आठवडा सामान्यच आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्ती जर नोकरीत परिवर्तन करू इच्छित असतील तर त्यांनी हा विचार सोडून द्यावा. अन्यथा सध्या असलेली नोकरी हातून जाऊ शकते. व्यापाऱ्यांसाठी आठवडा सामान्य आहे. प्रयत्न वाढवून व्यवसायाची वाढ करू शकाल. जर कामाच्या आधिक्याने पाय किंवा कंबरदुखीने त्रस्त असाल तर काही काळासाठी काम थांबवून आराम करावा, अन्यथा अति थकवा येऊन आजारी पडू शकता. विद्यार्थ्यांनी ह्या आठवड्यात कुसंगतीपासून दूर राहावे, अन्यथा नंतर पश्चाताप करावा लागू शकतो. प्रणयी जीवनात सामंजस्य दाखवावे लागेल, अन्यथा नात्यात दुरावा येऊ शकतो. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जोडीदाराच्या सहवासात सुखद क्षण घालवून आपले नाते अधिक दृढ करतील.
कुंभ: हा आठवडा सामान्यच आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्ती जर नोकरीत परिवर्तन करू इच्छित असतील तर ह्या आठवड्यात त्यांनी शांत राहून आपल्या सध्याच्या नोकरीतच राहावे. तेथेच मन लावून काम करावे. जे व्यापारी वाहन, प्रॉपर्टी इत्यादींचा व्यवसाय करत आहेत त्यांनी ह्या आठवड्यात सावध राहावे, अन्यथा त्यांना नुकसान सोसावे लागू शकते. ह्या आठवड्यात कोणालाही उसने पैसे देण्यापूर्वी भरपूर विचार करावा. ह्या आठवड्यात विद्यार्थ्यात आळसाचे प्रमाण वाढू शकते. जर त्यावर नियंत्रण ठेवले नाही तर परीक्षेचा परिणाम अपेक्षेनुसार येऊ शकणार नाही. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात काही कारणाने वाद होण्याची संभावना आहे. ह्या वादाचे वेळेवर निराकरण केले नाही तर वादाचे स्वरूप रुद्र रूप धारण करू शकते.
मीन: हा आठवडा चांगला आहे. ज्या व्यक्तींना नोकरीत परिवर्तन करावयाचे आहे त्यांनी सध्या पुढे जाऊ नये. व्यापाऱ्यांचा पूर्वीचा व्यवसाय ह्या आठवड्यात पुन्हा सुरु होऊ शकतो. ह्या आठवड्यात अत्यंत उर्जावान राहिलात तरी कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या प्रकृतीमुळे काहीसे त्रस्त होऊ शकता. ह्या आठवड्यात वायफळ खर्च खूपच होऊ शकतो. जर घर खरेदी करावयाचे असेल तर आर्थिक स्थितीचा आढावा घेऊनच पुढे व्हावे. वैवाहिक संबंध फारसे चांगले राहणार नाहीत. अशा वेळी वैवाहिक जोडीदाराच्या सहवासात जास्तीत जास्त वेळ घालविण्याचा प्रयत्न करावा.