साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 08:12 IST2025-10-05T07:58:28+5:302025-10-05T08:12:41+5:30

Weekly Horoscope: ०५ ऑक्टोबर २०२५ ते ११ ऑक्टोबर २०२५ हा कालावधी तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य…

Weekly Horoscope: या सप्ताहात दि. ९ रोजी शुक्र कन्या राशीत प्रवेश करील. अन्य कुठलाही ग्रहपालट नाही. ग्रहस्थिती अशी- हर्षल वृषभ राशीत, गुरू मिथुन राशीत, शुक्र आणि केतु सिंह राशीत आहे. दि. ९ रोजी शुक्र कन्या राशीत जाईल. तेथे त्याची युती रवीशी होईल. मंगळ आणि बुध तूळ राशीत, प्लूटो मकर राशीत, राहु कुंभ राशीत, तर शनि आणि नेपच्यून मीन राशीत आहेत.

चंद्राचे भ्रमण कुंभ, मीन, मेष आणि वृषभ राशींमधून राहील. सोमवारी कोजागरी पौर्णिमा आहे. दि. ५, ६ आणि ७ रोजी पंचक आहे. दि. ७ रोजी दुसऱ्या दिवशी उत्तर रात्री १.२८ वाजता पंचक सुटेल. मंगळवारी नवान्न पौर्णिमा आहे. शुक्रवार, १० ऑक्टोबर २०२५ रोजी अश्विन संकष्ट चतुर्थी आहे.

शुक्र आणि सूर्याच्या युतीने शुक्रादित्य राजयोग जुळून येत आहे. तसेच विविध उत्तम योगही जुळून येत आहेत. या आठवड्याचे एकंदरीत ग्रहमान पाहता कोणत्या राशींवर कसा प्रभाव असू शकेल? शुक्र गोचर कसे ठरू शकेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य...

मेष: हा आठवडा चांगला आहे. ह्या आठवड्यात पैशांचा ओघ सुरूच राहील, परंतु खर्चात वाढ झाल्याने त्रस्त होण्याची संभावना आहे. ह्या आठवड्यात एखादे घर खरेदी करण्याची योजना आखाल. व्यापाऱ्यांना विचारपूर्वक काम केल्यास चांगले फळ मिळण्याची संभावना आहे. नोकरी करणाऱ्यांना ह्या आठवड्यात नवीन काहीतरी करण्याची संधी मिळेल. त्यांच्या काही नवीन ओळखी होतील. विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. अभ्यासाकडे दुर्लक्ष केल्यास समस्या वाढू शकतात. ह्या आठवड्यात सावध राहून कामे करावी लागतील. आहारावर लक्ष ठेवावे.

वृषभ: हा आठवडा सामान्य फलदायी आहे. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करणे हितावह ठरेल. दिखाऊपणा करण्याच्या नादात बराचसा पैसा खर्च कराल. ह्या आठवड्यात आर्थिक गुंतवणूक करण्याची योजना आखावी. इतर कामांकडे जास्त लक्ष देऊ नये. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून चांगला लाभ होण्याची संभावना आहे. कारकिर्दीत जास्त मेहनत करावी लागेल. अर्थात त्याच बरोबर यश नक्कीच मिळेल. व्यापाऱ्यांना एखादा मोठा व्यापारी प्रकल्प हाती लागल्याने ते खुश होतील. नोकरी करणाऱ्यांना विचारपूर्वक कामे करावी लागतील. अन्यथा त्यांच्या समस्या वाढतील. विद्यार्थी अभ्यासाऐवजी मौजमजा करण्यास प्राधान्य देतील त्याचा त्यांना नंतर पश्चाताप होईल. तेव्हा त्यांनी अभ्यासाकडे लक्ष देणे त्यांच्या हिताचे होईल. अध्यापकांचे पूर्ण सहकार्य मिळेल.

मिथुन: हा आठवडा सकारात्मक परिणाम घेऊन येत आहे. ह्या आठवड्यात तणावापासून दूर राहण्याची गरज आहे. आर्थिक बाबतीत कोणावरही विश्वास ठेवू नये. तसेच वायफळ खर्चांवर नियंत्रण ठेवावे. ज्यामुळे बचतीवर पूर्ण लक्ष देऊ शकाल. कोणाला वचन दिले असल्यास ते ह्या आठवड्यात पूर्ण करू शकाल. ह्या आठवड्यात कारकिर्दी विषयक योजना फलद्रुप होईल. व्यापार वृद्धिंगत झाल्याने खुश व्हाल. नोकरी करणाऱ्यांना एखादी नवीन नोकरी लागल्याने ते खुश होतील. ते मित्रांसह एखादी पार्टी करू शकतात. सहकारी कामात पूर्ण सहकार्य करतील, त्यामुळे खुश व्हाल. विद्यार्थ्यांनी समाज माध्यम व इतर कामांकडे लक्ष देण्याऐवजी अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे हितावह होईल. ह्या आठवड्यात ते एखाद्या नवीन अभ्यासक्रमाची तयारी करू शकतात. आहारावर लक्ष ठेवावे.

कर्क: हा आठवडा मिश्र फलदायी आहे. नाते सांभाळण्याचा प्रयत्न करावा. बोलताना मागील कोणत्याही गोष्टींची उजळणी होणार नाही ह्याची काळजी घ्यावी. ह्या आठवड्यात काही धार्मिक कार्यासाठी पैसा खर्च कराल. एखादी तीर्थयात्रा करण्याची योजना आखू शकता. सावध राहावे लागेल. एखाद्या सरकारी योजनेत आर्थिक गुंतवणूक करणे हिताचे होईल. बुडालेले पैसे परत मिळाल्याने आर्थिक स्थिती मजबूत होईल. कारकिर्दीत काहीतरी नवीन करण्यात यशस्वी व्हाल. जास्तीत जास्त वेळ व्यापारास द्याल. व्यापारास प्रगतीपथावर नेण्यात यशस्वी व्हाल. नोकरी करणाऱ्यांनी अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नये. ही व्यक्ती प्रगतीच्या आड येऊ शकते. ह्या आठवड्यात वरिष्ठांच्या विरोधात जाणे टाळा. ह्या आठवड्यात विद्यार्थी इतरत्र जाऊन समस्या दूर करण्याचा प्रयत्न करतील. ते ज्ञानात वाढ करू शकतील. हा आठवडा उच्च शिक्षणास अनुकूल आहे.

सिंह: हा आठवडा तणावग्रस्त आहे. आर्थिक बाबतीत आठवडा चांगला आहे. एखाद्या प्रॉपर्टीत दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करणे हितावह होईल. शेअर्स बाजाराशी संबंधित व्यक्ती एखाद्या अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्यानुसार मोठी गुंतवणूक करू शकतील. कुटुंबियांचा सल्ला घेऊन एखादा महत्वाचा निर्णय व्यापारात घेतलात तर तो हिताचा असेल. इतरांच्या भरंवशावर कोणतेही काम करू नये, त्याने समस्यांना सामोरे जावे लागेल. नोकरी करणाऱ्यांना कामात अडचणी येतील. त्यांचे काही गुप्त शत्रू कामात खोडा घालण्याचा प्रयत्न करतील. आपल्याविरुद्ध राजकारण खेळले जाऊ शकते. तेव्हा त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थी अध्ययनात चांगली कामगिरी करू शकतील. परंतु त्यांच्यातील अति आत्मविश्वासामुळे परीक्षेत त्यांची कामगिरी खराब होऊ शकते. त्यामुळे कदाचित परीक्षेस पुन्हा बसावे लागू शकते. ते ज्ञान वाढविण्याच्या प्रयत्नांत यशस्वी होतील. ह्या आठवड्यात जर ते मित्र व समाज माध्यमांपासून दूर राहिले तर हितावह होईल.

कन्या: हा आठवडा गोंधळ उडवणारा आहे. ह्या आठवड्यात आर्थिक बाबतीत एखाद्या वादात अडकू शकता. बुडालेला पैसा मिळण्याची संभावना आहे. ह्या आठवड्यात रिअल इस्टेट इत्यादीत गुंतवणूक करण्यापूर्वी थोडे सतर्क राहावे लागेल. प्रॉपर्टीत दीर्घ काळासाठी गुंतवणूक केल्यास चांगला लाभ होईल. व्यापारात जास्त काम करावे लागेल. कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नये. कोणाच्याही दबावाखाली काम करू नका. ह्या आठवड्यात एखादा प्रकल्प मिळण्याची संभावना आहे. नोकरी करणाऱ्यांची पदोन्नती होऊन त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावे लागू शकते. कामाच्या बाबतीत सावध राहावे लागेल. ह्या आठवड्यात विद्यार्थ्यांना मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करावा लागेल. वेळ वाया घालवला, तर नंतर पश्चाताप करावा लागेल. कोणत्याही प्रकारचा ताण न घेता अभ्यास करावा.

तूळ: हा आठवडा ठीक आहे. ह्या आठवड्यात आर्थिक बाबतीत सतर्क राहावे लागेल. कोणतीही आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करावी. खर्चांवर नियंत्रण ठेवावे. प्राप्तीचे स्रोत वाढविण्यावर लक्ष द्यावे. कारकिर्दीत यशस्वी होण्याची संधी आहे. व्यापारात एखाद्या नवीन योजनेची सुरवात कराल. नवीन संपर्कातून व्यावसायिक लाभ होईल. व्यवसायाची वृद्धी होईल. त्यामुळे खुश व्हाल. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती झाल्याने प्रशंसेचा वर्षाव होत राहील. जर नोकरीत बदल करावयाचा असेल तर तो बदल हिताचा राहील. ह्या आठवड्यात विद्यार्थी अभ्यासाच्या बाबतीत सतर्क राहतील. ते एखाद्या छोट्या अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ शकतील. एखाद्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ते विचार करू शकतील. त्यासाठी एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे हितावह ठरेल. एखाद्या नोकरीसाठी प्रयत्न केल्यास त्यात यशस्वी होऊ शकता. हिंडण्या-फिरण्यावर थोडे नियंत्रण ठेवावे.

वृश्चिक: हा आठवडा चांगला आहे. ह्या आठवड्यात थोडे सावध राहावे लागेल. ह्या आठवड्यात सुख-सुविधांसाठी पैसे खर्च कराल. पण, बचतीकडे लक्ष नसल्याने पश्चाताप करण्याची पाळी येईल. कपडे, महागडे मोबाइल किंवा एखादे वाहन खरेदी करू शकता. ह्या आठवड्यात कारकिर्दीत समाधान होणार नाही. काही नवीन कंपन्या आपल्यासाठी लाभ घेऊन येतील, ज्याचा पुरेपूर फायदा घ्यावा. कोणाशीही आर्थिक देवाण-घेवाण विचारपूर्वक करावी. ह्या दरम्यान नोकरी बदलल्यास नुकसान होऊ शकते. तेव्हा सध्याच्या नोकरीत टिकून राहणे हितावह होईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे यथायोग्य फळ मिळेल. त्यांनी ह्या दरम्यान जर एखादी परीक्षा दिली तर त्यात ते यशस्वी होतील. मात्र त्यांनी अति आत्मविश्वास बाळगू नये. अन्यथा त्यांना परीक्षेस पुन्हा बसावे लागू शकते.

धनु: हा आठवडा मिश्र फलदायी आहे. ह्या आठवड्यात एखादी आर्थिक योजना तयार करणे हिताचे होईल. योजना उत्तमच असेल. ह्या आठवड्यात बुडालेला पैसा परत मिळण्याची संभावना आहे. एखाद्या जमीन-जुमल्यात आर्थिक गुंतवणूक केल्यास चांगला लाभ होईल. नोकरी करणाऱ्यांनी सहकाऱ्यांशी फक्त कामापुरते संबंध ठेवणे हितावह होईल. कोणाचीही थट्टा - मस्करी करू नये, अन्यथा कुटुंबापर्यंत त्याची वाच्यता होऊन त्रास होईल. व्यापारात घाई केल्यास समस्या वाढू शकतात. तेव्हा विचारपूर्वक पाऊल उचलावे. जर काही न समजल्यास एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा. विद्यार्थी एखाद्या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. ते बाहेर फिरावयास जाऊ शकतात. त्यांनी काहीही केले तरी अभ्यासासाठी त्यांना वेळ काढावाच लागेल. बाहेर जाऊन अभ्यास करणे त्याच्या हिताचे होईल. आहारावर लक्ष ठेवावे लागेल. कामाच्या बरोबरीने विश्रांती घेण्याकडे लक्ष द्यावे.

मकर: हा आठवडा सकारात्मक परिणाम घेऊन येत आहे. ह्या आठवड्यात वायफळ खर्च डोकेदुखी ठरेल. ह्याचा परिणाम आर्थिक स्थितीवर होईल. आर्थिक बाबतीत वचनबद्ध होऊ नये. तसेच कोणतेही वायफळ खर्च करू नये. व्यापाऱ्यांनी त्यांच्या व्यवसायात काही बदल केल्यास तो त्यांच्या हिताचा होईल. काही नवीन ओळखी त्यांच्या पसंतीस उतरतील. नोकरी करणाऱ्यांना एखादी खुशखबर मिळण्याची संभावना आहे. पदोन्नती संभवते. विद्यार्थ्यांनी अध्ययनावर लक्ष केंद्रित करावे. इतरत्र लक्ष दिल्यास एखादी परीक्षा देण्यात समस्या निर्माण होतील. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांना ह्या आठवड्यात एखादी खुशखबर मिळू शकते. एखाद्या नवीन संशोधनात सहभागी होऊ शकता. दिनचर्येत योगासनांचा समावेश करावा.

कुंभ: ह्या आठवड्यात विचारपूर्वक कामे करावी लागतील. ह्या आठवड्यात खर्चात वाढ झाल्याने त्रासून जाल. ह्या आठवड्यात प्रवास करण्यावर भरपूर पैसे खर्च कराल. कोणाला वचन दिले असल्यास ते ह्या आठवड्यात पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. ह्या आठवड्यात विद्यार्थ्यांना अध्ययनावर लक्ष द्यावे लागेल. मित्र त्यांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतील व त्यामुळे विद्यार्थ्यांना समस्येला सामोरे जावे लागेल. तेव्हा काही काळासाठी मित्रांपासून दूर राहावे व अभ्यासास वेळ द्यावा. ह्या आठवड्यात कारकिर्दीत चढ-उतार येतील. दगा-फटका होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांनी इतरांवर अवलंबून राहू नये. अन्यथा काम पूर्ण न झाल्याने वरिष्ठांची बोलणी खावी लागतील. बाहेरगावी गेलात तर आहाराकडे दुर्लक्ष करू नये.

मीन: हा आठवडा मिश्र फलदायी आहे. ह्या आठवड्यात आर्थिक स्थिती काहीशी नाजूक होईल. परंतु दिखाऊपणामुळे ती अजून नाजूक करू शकाल. तेव्हा दिखाऊपणा सोडावा. ह्या उलट आर्थिक गुंतवणूक करण्याचा विचार करावा. ह्या आठवड्यात व्यापाऱ्यांना एखादा चांगला प्रकल्प मिळाल्याने ते खुश होतील. त्यांना लोकांचे सहकार्य मिळेल. नोकरी करणाऱ्यांना ह्या आठवड्यात एखाद्या दुसऱ्या नोकरीची ऑफर मिळाल्याने ते खुश होतील. मन इतर कामांकडे वळल्याने खुश व्हाल. विद्यार्थी खूप मेहनत करतील, त्यामुळे त्यांना फळ चांगलेच मिळेल. त्यांचा एखादा अभ्यासक्रम स्थगित झाला असेल तर ते पुन्हा त्यात प्रवेश घेऊ शकतात. जे त्यांच्या हिताचे होईल. त्यात येणाऱ्या अडचणी ते वरिष्ठांच्या मदतीने दूर करू शकतील.