Vastu Tips : घरात ठेवलेल्या या पाच वस्तू त्वरित हटवा, अन्यथा हरवेल कुटुंबातील सुख-शांती, येईल दारिद्र्य

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 04:24 PM2022-07-11T16:24:31+5:302022-07-11T16:30:21+5:30

Vastu Tips: एखाद्या घरात कुठल्याही वस्तूची कमरता नसतानाही त्या घरात सुख शांती नांदत नसल्याचे, कुटुंबात वाद विवाद होत असल्याचे तुम्ही पाहिले असेल. याचं कारण वास्तू असू शकते याचा विचार तुम्ही कधी केला आहे का. हो वास्तुशास्त्रानुसार घरात प्रत्येक वस्तू योग्य ठिकाणी आणि योग्य दिशेला ठेवणं आवश्यक आहे. जर असे नसेल तर त्या वस्तू वास्तू दोषाचं कारण ठरू शकतात.

एखाद्या घरात कुठल्याही वस्तूची कमरता नसतानाही त्या घरात सुख शांती नांदत नसल्याचे, कुटुंबात वाद विवाद होत असल्याचे तुम्ही पाहिले असेल. याचं कारण वास्तू असू शकते याचा विचार तुम्ही कधी केला आहे का. हो वास्तुशास्त्रानुसार घरात प्रत्येक वस्तू योग्य ठिकाणी आणि योग्य दिशेला ठेवणं आवश्यक आहे. जर असे नसेल तर त्या वस्तू वास्तू दोषाचं कारण ठरू शकतात.

जर तुमच्या घरात तुटकं फुटकं फर्निचर असेल तर ते त्वरित हटवा. तुटलेल्या फर्निचरमुळे निगेटिव्हिटी निर्माण होते. तसेच त्यामुळे घरात सुख-समृद्धी नांदण्यात अडचणी निर्माण होतात. त्याशिवाय फाटक्या जुन्या चपलासुद्धा घरात ठेवू नयेत त्यामुळे आर्थिक स्थितीवर परिणाम होतो.

बंद पडलेलं घड्याळ कधीही घरात ठेवू नये, असं घड्याळ निगेटिव्ह एनर्जी आपल्याकडे आकर्षित करते. बंद घड्याळ तुमच्या प्रगतीसाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे जर तुमच्या घरात बंद पडलेलं घड्याळ असेल तर ते त्वरित हटवा.

जर तुमच्या घरामध्ये हिंसक जनावरांचे फोटो असतील तर त्या त्वरित हटवा. त्या कुटुंबात भांडणाचं कारण ठरू शकतात. तसेच घरामध्ये काळ्या रंगाची नेम प्लेटसुद्धा लावता कामा नये. तसेच घरात महाभारताच्या युद्धाचं चित्र, नटराजाची मूर्ती, ताजमहालाचं चित्र, बुडत्या नावेचा फोटो लावू नये. या फोटोंमुळे नकारत्मकता निर्माण होते. त्यामुळे तुमचे जीवन प्रभावित होऊ शकते.

घरात वृक्ष वेली लावणे हे शुभ मानले जाते. मात्र घरात अशी झाडे लावताना थोडी काळजी घेतली पाहिजे. चुकूनही घरात काटेरी झाडे लावता कामा नयेत. जर तुमच्या घरात काटेरी झाडे असतील तर ती त्वरित बाहेर काढा. त्याशिवाय घरामध्ये सुकी फुलेही ठेवता कामा नये.

वास्तू शास्त्रानुसार तुम्ही घरामध्ये तुटक्या भांड्यांचा वापर करता कामा नये. तसेच अशी भांडी घरात ठेवता कामा नये, अशी भांडी घरात असतील तर ती तात्काळ फेकून दिली पाहिजेत.