१७८ वर्षांनी अद्भूत योग: ५ राशींना लॉटरी, भगवती देवीचे वरदान; ग्रहणाला त्रिग्रह शुभ करतील!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 01:40 PM2023-10-11T13:40:30+5:302023-10-11T13:49:16+5:30

सर्वपित्री अमावास्येला लागणारे सूर्यग्रहण काही राशींना उत्तम ठरू शकेल. नवरात्र सुरु होताना अनेक लाभ मिळू शकतील. जाणून घ्या...

१४ ऑक्टोबर रोजी सर्वपित्री अमावास्येला सन २०२३ मधील सूर्यग्रहण लागणार आहे. विशेष म्हणजे या सूर्यग्रहणाला १७८ वर्षांनी अद्भूत योग जुळून येत आहे. खगोलीय, धार्मिक दृष्टिकोनातून विचार केल्यास सूर्यग्रहण महत्त्वाचे मानले जात आहे. उत्तर भारतातील अनेक भागात पौर्णिमेपासून महिना सुरू होण्याची परंपरा असल्यामुळे तेथे अश्विन अमावास्या आहे.

मराठी वर्षानुसार अमावास्येला महिना संपतो. त्यामुळे महाराष्ट्रासह लगतच्या राज्यांमध्ये भाद्रपद अमावास्या असेल. भाद्रपद अमावास्या ही सर्वपित्री अमावास्या म्हणून ओळखली जाते. सर्वपित्री अमावास्येला सूर्यग्रहण लागत आहे. लगेच दुसऱ्या दिवशी १५ ऑक्टोबर रोजी घटस्थापन असून, नवरात्रारंभ होत आहे.

सर्वपित्री अमावास्येला लागणारे सूर्यग्रहण हे कन्या राशीत असून, कन्या राशीत त्रिग्रही योग जुळून येत आहे. सूर्य आणि बुध कन्या राशीत असून, चंद्रही याच राशीत असणार आहे. सूर्यग्रहण आणि या योगांचा ५ राशींना अतिशय उत्तम लाभ मिळणार आहे, असे सांगितले जाते. जाणून घेऊया...

मिथुन राशीच्या व्यक्तींना सूर्यग्रहण शुभ-लाभदायक ठरू शकेल. करियरमध्ये प्रगती होऊ शकेल. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. जीवनात सुख-सुविधा वाढतील. ऑफिसमध्ये मान-सन्मान वाढेल. कामाचे कौतुक होईल. आदर वाढेल. जीवनात अपेक्षित यश मिळेल. परदेशात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सकारात्मक बातमी मिळण्याची शक्यता आहे.

सिंह राशीच्या व्यक्तींना सूर्यग्रहण शुभ ठरू शकेल. करिअर आणि व्यवसायात प्रगती होऊ शकेल. उत्तम यश मिळू शकेल. हितशत्रूंवर विजय मिळवू शकाल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर दुर्गा देवीचे शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकतील. हा काळ अनुकूल ठरू शकेल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. मन प्रसन्न राहील.

तूळ राशीच्या व्यक्तींना सूर्यग्रहण सकारात्मक ठरू शकेल. करिअर आणि बिझनेसमध्ये अनुकूल बदल घडू शकतील. कुटुंबातील बदल सकारात्मक ठरू शकतील. पद, पैसा आणि प्रतिष्ठा लाभेल. समाजात मान-सन्मान वाढू शकेल. करिअरमध्ये अपेक्षित प्रगती साध्य करता येऊ शकेल. धनलाभाचे योग जुळून येऊ शकतील. ऑफिसमध्ये वरिष्ठ तुमच्या प्रमोशनबाबत विचार करू शकतात. कौटुंबिक जीवन आनंददायी ठरू शकेल.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी सूर्यग्रहण सुख-समृद्धीदायक ठरू शकेल. आत्मविश्वास वाढेल. मेहनतीचे चीज होईल. जीवनातील सर्व आघाड्यांवर यश-प्रगती साध्य करता येऊ शकेल. कुटुंबातील सदस्यांचे उत्तम सहकार्य लाभू शकेल. दुर्गा देवीच्या आशिर्वादामुळे भाग्याची भक्कम साथ मिळू सकेल. कमाईचे नवीन स्रोत उपलब्ध होऊ शकतील. वैयक्तिक आयुष्यात सुखाचा काळ ठरू शकेल.

मकर राशीच्या व्यक्तींसाठी सूर्यग्रहण अनुकूल ठरू शकेल. करिअरसाठी लाभदायक ठरू शकेल. एखादी मोठी बातमी मिळण्याचे संकेत आहेत. मिळकत वाढू शकेल. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकेल. नव्या नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर दुसऱ्या कंपनीकडून चांगली ऑफर मिळण्याची शक्यता आहे. जमीन, मालमत्ता, वाहन खरेदीची योजना पूर्ण होऊ शकेल. बिझनेस, व्यापार यांमध्ये अडकलेला पैसा मिळण्याची शक्यता आहे.

सूर्यग्रहणाचा प्रभाव देश-दुनियेसह सर्व राशींवर मूलांकांवर असेल. भारतातून हे सूर्यग्रहण दिसणार नाही. त्यामुळे वेधादि नियम पाळू नयेत, असे सांगितले जात आहे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.