गजकेसरी राजयोगात श्रीराम नवमी २०२६: ७ राशींना शुभ वरदान, पगारवाढ-धनलाभ; सुख-समृद्धी-भरभराट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 15:48 IST2026-03-25T15:30:50+5:302026-03-25T15:48:56+5:30

Shri Ram Navami 2026 Astrology: श्रीराम नवमीला अनेक शुभ योग जुळून आले असून, तुमच्या राशीवर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घ्या...

Shri Ram Navami 2026 Astrology: गुरुवार, २६ मार्च २०२६ रोजी श्रीराम नवमी आहे. संपूर्ण भारतात हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. अयोध्येतील भव्य राम मंदिरात विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महाराष्ट्रातही श्रीराम नवमी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. या दिवशी राम नवरात्राची सांगता होते.

ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने यंदाच्या श्रीराम नवमीला अतिशय शुभ मानला गेलेला गजकेसरी राजयोग जुळून येत आहे. तसेच कुंभ आणि मीन राशीत त्रिग्रही योग जुळून आलेला आहे. याशिवाय नक्षत्र आर्द्रा असणार आहे. तर, योग शोभन आहे.

प्रभू श्रीराम आजही लाखो लोकांचे प्रेरणास्थान आहे. रामराज्याची संकल्पना सत्यात उतरावी, यासाठी आजही प्रयत्न केले जात आहेत. कोट्यवधि भक्त रामचरणी लीन होताना पाहायला मिळतात. अतिशय शुभ योगात आलेल्या श्रीराम नवमीचा कालावधी तुमच्यासाठी कसा असेल? कोणत्या राशींवर काय प्रभाव असेल? जाणून घेऊया...

मेष: ग्रहमानाची अनुकूलता बाजूने राहील. अनेक अडचणी दूर झाल्यामुळे उत्साह वाढेल. नवीन संकल्प राबविण्यात रस राहील. जीवनसाथीचा चांगला सहयोग राहील. धनलक्ष्मीची कृपा राहील. मात्र, देवाणघेवाण करताना थोडी खबरदारी घ्या. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. जनसंपर्क चांगला राहील. जवळचा प्रवास होईल. भावंडांच्या भेटीगाठी होतील. सहवासात मजेत वेळ जाईल. व्यवसायात भरभराट होईल. कामात बदल होतील.

वृषभ: मोहापासून दूर राहा. काही किरकोळ स्वरूपाच्या अडचणी असतील. मात्र, थोडा संयम ठेवा. अडचणी दूर होण्यास वेळ लागणार नाही. ग्रहमान अनुकूल राहील. मात्र, प्रेमात असणाऱ्यांनी सावधपणे वागण्याची गरज आहे. कुणी मोहाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करेल. अधिकारी वर्गाने प्रलोभनांना बळी पडू नये. व्यवसायात नवीन प्रयोग करून पाहिले जातील, धनप्राप्ती होईल. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. एकंदरीत काळ अनुकूलता राहील.

मिथुन: पैसा मिळेल आणि तो खर्चही होईल. काहींना अचानक प्रवास करावा लागेल, प्रवासात सतर्क राहा. ऐनवेळी नियोजित कार्यक्रमात बदल होऊ शकतात. त्यामुळे धावपळ व अनाठायी खर्च होईल. अडचणी दूर होतील. परिस्थिती आटोक्यात येईल. प्रेमात सफलता मिळेल. भेटवस्तू व विविध प्रकारचे लाभ होतील. व्यवसायात तुमचे महत्त्व वाढेल, धनलाभ होईल. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल.

कर्क: हा कालावधी यशदायक ठरेल. सामाजिक मान-सन्मान मिळेल. नोकरीत नवीन प्रकल्पासाठी नावाचा विचार केला जाईल. नवीन संधीचे सोने कराल. धनलक्ष्मीची प्रसन्नता राहील. भेटवस्तू मिळतील. लोकांचे चांगले सहकार्य मिळेल. मनात आध्यात्मिक विचार राहतील. तीर्थयात्रा घडेल. प्रवासात सतर्क राहा. खर्चावर नियंत्रण ठेवा. मन आनंदी राहील. प्रेमात असणाऱ्यांना भेटवस्तू मिळतील. वडीलधाऱ्या मंडळींचा मान राखा.

सिंह: मान-सन्मान मिळेल. उत्साही वाटेल. नवीन माहिती कळेल. मौजमजा कराल. अनेक प्रलंबित कामे आटोक्यात येतील. त्यामुळे मनावरील ताण निघून जाईल. प्रवासाचे बेत ठरतील. नोकरीत अचानक नवीन संधी मिळेल. पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. घरात एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. घराच्या सजावटीकडे लक्ष द्याल. काही अनाहूत पाहुणे येतील. महत्त्वाची कामे होतील. धनलाभ होईल.

कन्या: चांगल्या संधी मिळतील. चांगले यश देणारा काळ ठरेल. मन आनंदी राहील. समाजात मान वाढेल. कलाकार मंडळींना प्रोत्साहन मिळेल. काहींना पुरस्कार जाहीर होतील. नोकरीत अनुकूल वातावरण राहील. पगारवाढ होईल. सोयी-सुविधा वाढवून मिळतील. घरात मंगलमय वातावरण राहील. महागड्या वस्तू खरेदी कराल.

तूळ: अधिक चांगली फळे देणारा काळ ठरू शकेल. कामाचा उत्साह राहील. मोठ्या योजना आखल्या जातील. मात्र, अति आत्मविश्वास दाखवून चालणार नाही. घाईघाईत कामे उरकण्याचा प्रयत्न करू नका, वाहन हळू चालवा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. अडचणी दूर होतील. मनात सकारात्मक विचार राहतील. समाजात मान वाढेल. पुरस्कार जाहीर होतील. शैक्षणिक प्रगतिपुस्तक झळकते राहील.

वृश्चिक: संमिश्र फळे देणारा कालखंड आहे. कार्यक्षेत्रात सहकारी वर्गाशी जुळवून घेणे योग्य ठरेल. विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील. योजनांच्या बाबतीत गुप्तता पाळली पाहिजे. आरोग्याची काळजी घ्यावी. तरुण वर्गाने मोहापासून स्वत:ला दूर ठेवण्याची गरज आहे. शांत्तचित्ताने कामे करा. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो. अनुकूलता अनुभवायला मिळेल. सामाजिक मान-सन्मान मिळेल.

धनु: काही कटू तर काही गोड अनुभव येतील. उत्साहाचा काळ राहू शकेल. मुलांची प्रगती कळेल. परीक्षा देणाऱ्यांना सफलता मिळेल. चांगल्या मित्रांच्या संगतीत राहून स्वतःची प्रगती साधून घ्याल. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. जीवनसाथीशी सूर जुळतील. विवाहेच्छूसाठी अनुकूल काळ आहे. चांगली स्थळे चालून येतील. व्यवसायात भरभराट होईल. महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. वाहने जपून चालवा.

मकर: नोकरी-व्यवसायात व्यस्तता राहील. व्यवसायात नवनवीन प्रयोग करून पाहिले जातील. नोकरीत सहकारी वर्गाची चांगली साथ राहील. हाती घेतलेले प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण कराल. मुलांची प्रगती होईल. जवळच्या सहलीला जाऊन याल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगला काळ आहे. जीवनसाथीशी सूर जुळतील. भेटवस्तू प्राप्त होतील. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. आरोग्याची काळजी घ्यावी. खाण्यापिण्याचे पथ्य पाळा. अनुकूलता बाजूने राहील.

कुंभ: ग्रहमानाची अनुकूलता बाजूने राहील. त्यामुळे महत्त्वाची कामे झटपट आटोपून घ्या. व्यवसायात सतत व्यस्त राहाल. जवळच्या प्रवासाचे योग येतील. नातेवाइकांच्या भेटीगाठी होतील. काही अनपेक्षित पाहुणे घरी येतील. त्यामुळे तारांबळ उडेल. नोकरीत अचानक बदल होऊ शकतात. नवीन नोकरी मिळू शकते. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगला काळ आहे. संततीचे यश सुखावून जाईल. फार दगदग होईल अशी कामे करू नका.

मीन: विविध आघाड्यांवर यश मिळू शकेल. चंद्राचे भ्रमण लाभदायक ठरेल, धनलाभ, व्यवसायात बरकत, नोकरीत प्रगती, शैक्षणिक यश, घरातील मंगल कार्य इत्यादी दृष्टीने अत्यंत चांगला काळ आहे. मात्र, नियमानुसार कामे करा. जीवनसाथीची मर्जी राखा. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. भावंडांशी गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. नोकरीत पगारवाढ होईल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.