श्रीकृष्ण जन्मोत्सव: ३ शुभ योगांचा लाभ, ५ राशी लकी; राधा-कृष्णाची कृपा, सुख-समृद्धी काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 11:15 AM2023-09-06T11:15:38+5:302023-09-06T11:25:56+5:30

श्रीकृष्ण जन्मोत्सवाला काही अद्भूत शुभ योग जुळून येत असून, ५ राशीच्या व्यक्तींना सुख-समृद्धी-संपन्नता लाभू शकते, असे म्हटले जाते. जाणून घ्या...

श्रीकृष्ण जन्मोत्सवाला अनेक अद्भूत योग तयार होत आहेत. ०६ सप्टेंबर रोजी दिवसभर सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे. सर्वार्थ सिद्धी योगात चंद्र वृषभ राशीत आणि रोहिणी नक्षत्रात असताना एक विशेष योग जुळून येत आहे. श्रावण कृष्ण पक्ष, मध्यरात्री अष्टमी तिथी आहे. जेव्हा जन्माष्टमी बुधवार किंवा सोमवारी येते तेव्हा ती खूप शुभ मानली जाते. यावेळी ०६ सप्टेंबर रोजी एक अत्यंत दुर्मिळ योग जुळून येत आहे. जेव्हा असा योग जुळून येतो, तेव्हा त्याला जयंती योग म्हणतात, असे सांगितले जाते.

०६ सप्टेंबर रोजी श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. सदर योगांसह रोहिणी नक्षत्रावर हर्ष नामक योग जुळून येत आहे. बुधवारी श्रीकृष्ण जयंती येणे अतिशय शुभ मानले जाते. या दिवशी जुळून आलेल्या अनेकविध योगांमुळे जन्माष्टमीच्या शुभ प्रभावात भर पडली असून, दिवसाचे महत्त्व अनेकपटीने वाढल्याचे सांगितले जात आहे.

या एकूण ग्रहमानाला आणि शुभ योगांचा ५ राशीच्या व्यक्तींवर अतिशय सकारात्मक प्रभाव पाहायला मिळू शकतो. जीवनातील अनेकविध आघाड्यांवर श्रीकृष्ण जन्मोत्सव लाभदायक ठरू शकतो. सुख-समृद्धी-संपन्नता प्राप्त होऊ शकते, असे म्हटले जाते. कोणत्या ५ राशीचे व्यक्ती भाग्यवान ठरू शकतील? जाणून घेऊया...

मेष राशीच्या व्यक्तींना श्रीकृष्ण जन्मोत्सव शुभ फलदायी ठरू शकेल. रोहिणी नक्षत्राच्या शुभ प्रभावामुळे संयम, धैर्य आणि पराक्रम वाढेल. आर्थिक बाबतीत भरपूर लाभ होण्याची शक्यता असून धार्मिक कार्यात मन व्यस्त राहील. कठोर परिश्रमांसोबतच ध्येय पूर्ण करू शकाल. नशिबाच्या पाठिंब्यामुळे नोकरी व्यवसाय करणाऱ्यांना उत्तम पैसा मिळू शकेल. चांगल्या कर्मांमुळे संपूर्ण कुटुंबाचा अभिमान वाढेल. समाजात नाव उंचावेल. मन प्रसन्न होईल. श्रीकृष्णासह प्रथमेश गणेशाचे विशेष पूजन करावे. दुधाचा समावेश असलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा.

वृषभ राशीच्या व्यक्तींना श्रीकृष्ण जन्मोत्सव आनंददायी ठरू शकेल. जयंती योगाचा शुभ प्रभाव आणि नशिबाच्या भक्कम पाठिंब्यामुळे अडकलेला पैसा मिळू शकेल. मन धर्माच्या कामात व्यस्त राहू शकेल. एकूण परिस्थिती शुभ राहू शकेल. मन प्रसन्न राहील. आदर वाढेल. आई-वडिलांचा आशीर्वाद घेऊन केलेल्या कामात यश मिळेल. नोकरदारांना नातेवाईकांची मदत मिळू शकते. भौतिक सुखसोयी वाढतील.

सिंह राशीच्या व्यक्तींना श्रीकृष्ण जन्मोत्सव सुखद ठरू शकेल. हर्ष योगाचा शुभ परिणाम धन-समृद्धीचा शुभ संयोग होईल. मनाला समाधान मिळेल. सरकारी अधिकाऱ्याची मदत मोलाची ठरू शकेल. नोकरी व्यावसायिकांना नवीन संधी मिळतील. करिअरला प्रगतीच्या मार्गावर नेतील. काही लोकांना परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. व्यावसायिक नवीन संपर्क साधू शकतील, ज्यातून चांगला नफा मिळू शकेल. कौटुंबिक जीवन चांगले राहील. पालकांचा आशीर्वाद मिळेल. लाडवांचा नैवेद्य गणपती आणि बाळकृष्णाला दाखवा.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना श्रीकृष्ण जन्मोत्सव लाभदायक ठरू शकेल. रोहिणी नक्षत्राच्या शुभ प्रभावाने धनसंचय करण्यात यश मिळेल. जीवनसाथीसोबतचे नाते दृढ होईल. कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी होऊ शकेल. करिअरमध्ये स्थैर्य अनुभवता येईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शुभ काळ राहील. गरजूंना अन्नदान करावे. वस्त्रदान करणे उपयुक्त ठरू शकेल.

धनु राशीच्या व्यक्तींना श्रीकृष्ण जन्मोत्सव शुभ ठरू शकेल. जयंती योगाच्या शुभ प्रभावामुळे गुंतवणुकीतून चांगले लाभ मिळतील. तसेच श्रीगणेशाच्या कृपेने नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदीची योजना यशस्वी होईल. परदेशात काम करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील. कुटुंबातील सदस्यांकडून काही चांगली बातमीही ऐकायला मिळेल. मित्रांकडून सहकार्य मिळेल. अपूर्ण कामे पूर्ण होतील. भागीदारीत काम करणार्‍यांसाठी शुभ राहील, लाभाची चांगली शक्यता आहे.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.