श्रावणाची सुरुवात गजलक्ष्मी योगात: ७ मूलांकांचे कल्याण, भरघोस लाभ; सुबत्ता-समृद्धी, शुभ काळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 09:09 IST2025-07-21T08:57:59+5:302025-07-21T09:09:38+5:30

Shravan 2025 Numerology: श्रावण मासाची सुरुवात होताच शुभ मानला गेलेला गजलक्ष्मी योग जुळून येत आहे.

Shravan 2025 Numerology: २५ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्रात श्रावण मास सुरू होत आहे. श्रावण महिन्यात प्रत्येक दिवसाचे महत्त्व अनन्य साधारण असेच आहे. श्रावणाला व्रत-वैकल्यांचा राजा मानले गेले आहे. या महिन्यात महादेव शिवशंकरांचे पूजन विशेष मानले जाते. श्रावण महिना सुरू होताच २६ जुलै २०२५ रोजी शुक्र ग्रह मिथुन राशीत प्रवेश करत आहे. मिथुन राशीत गुरू ग्रह विराजमान आहे. यामुळे गजलक्ष्मी योग जुळून येत आहे.

ज्योतिषशास्त्राच्या अनेकविध शाखा आहेत. त्यापैकी एक म्हणजे अंकशास्त्र. अंकशास्त्रात जन्मतारखेवरून मूलांक काढला जातो. या मूलांकांवरून भविष्यकथन केले जाऊ शकते. राशींप्रमाणे मूलांकांना ग्रहांचे स्वामित्व बहाल करण्यात आले आहे. ग्रहांच्या गोचराचा जसा राशींवर प्रभाव पडत असतो, तसा तो मूलांकांवरही पडतो, असे सांगितले जाते.

अंकशास्त्रात मूलांक ३ चा स्वामी गुरू आहे. तर मूलांक ६ चा स्वामी शुक्र आहे. गुरु आणि शुक्र हे दोन्ही एकमेकांचे शत्रू ग्रह मानले जातात. परंतु, या दोन ग्रहांच्या युतीने जुळून येणारा गजलक्ष्मी योग शुभ परिणामकारक मानला जातो. श्रावण महिन्याची सुरुवात कोणत्या मूलांकांसाठी कशी ठरेल? गजलक्ष्मी योगाचा प्रभाव कसा असेल? जाणून घेऊया...

ज्या व्यक्तींचा जन्म १, १०, २८ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक १ आहे. या मूलांकाचा स्वामी सूर्य आहे. जीवनात सकारात्मक बदल घडू शकतील. व्यावसायिकांना स्पर्धकांचे आव्हान असेल. सर्वोत्तम काम करून कठोर मेहनत घ्यावी लागेल. नोकरीसाठी मुलाखत दिलेल्यांना चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी प्रगतीचे नवीन मार्ग उघडू शकतात. कठोर परिश्रमाने अनेक क्षेत्रात यश मिळेल. मन आनंदी राहील.

ज्या व्यक्तींचा जन्म २, ११, २०, २९ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक २ आहे. या मूलांकाचा स्वामी चंद्र आहे. अडकलेला पैसा किंवा कोणाला दिलेली उधारी परत मिळण्याची शक्यता आहे. समस्येतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडू शकेल. अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवणे हितकारक ठरू शकेल. व्यवसायात नवीन गुंतवणूक करून नफा मिळवू शकता. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रम करून यश मिळेल.

ज्या व्यक्तींचा जन्म ३, १२, २१, ३० या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ३ आहे. या मूलांकाचा स्वामी गुरु आहे. अनावश्यक खर्च होतील. परंतु, त्यामुळे खिशावर भार येणार नाही. जितका खर्च होईल, त्यापेक्षा अधिक पैसे प्राप्त होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी सकारात्मकतेने काम करणे हिताचे ठरेल. प्रगती होईल. अचानक गुंतवणूक करणे टाळावे, अन्यथा मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

ज्या व्यक्तींचा जन्म ४, १३, २२, ३१ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ४ आहे. या मूलांकाचा स्वामी राहु आहे. चिडचिड वाढू शकेल. संयम सुटू शकेल. मानसिक शांतता कायम राखण्यासाठी ध्यानधारणा करणे हिताचे ठरू शकेल. गुंतवणुकीबाबत सजग राहणे आवश्यक आहे. संयमाने गुंतवणूक केल्यास लाभ प्राप्त होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी वादविवादापासून स्वतःला दूर ठेवावे. बॉस किंवा वरिष्ठ व्यक्तीशी मतभेद निर्माण होऊ शकतात.

ज्या व्यक्तींचा जन्म ५, १४, २३ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ५ आहे. या मूलांकाचा स्वामी बुध आहे. समस्येतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडू शकेल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा कालावधी अनुकूल ठरू शकतो. कामाचे कौतुक होऊ शकेल. परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. व्यवसायाच्या दृष्टीने काळ अनुकूल राहील. आनंद आणि समृद्धी येईल. कामाच्या ठिकाणी विरोधक कौतुक करतील.

ज्या व्यक्तींचा जन्म ६, १५, २४ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ६ आहे. या मूलांकाचा स्वामी शुक्र आहे. इच्छा असली, तरी विरोधक काही वाकडे करू शकणार नाहीत. विरोधकांना पुरून उराल. संघर्षानंतर यश मिळण्याची शक्यता वाढेल. संयम ठेवणे हिताचे ठरू शकेल. कामाच्या ठिकाणी विचार आणि संशोधन करून निर्णय घ्यावे लागतील. यामुळे अधिक यश मिळेल. आर्थिक बाबतीत जितके जास्त परिश्रम कराल, तितके चांगले परिणाम भविष्यात मिळू शकतील.

ज्या व्यक्तींचा जन्म ७, १६, २५ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ७ आहे. या मूलांकाचा स्वामी केतु आहे. कौटुंबिक पातळीवर चढ-उतार पाहायला मिळतील. रागावर नियंत्रण ठेवावे. अन्यथा, वाद होऊ शकतो. मुलांशी सबुरीने वागावे. व्यवसायात नवीन गुंतवणुकीतून यश मिळू शकते. धनलाभ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी परिस्थिती काहीशी प्रतिकूल असू शकते. करिअरच्या क्षेत्रात कितीही कठोर परिश्रम केले, तरी शुभ परिणाम मिळण्यास थोडा विलंब होऊ शकतो.

ज्या व्यक्तींचा जन्म ८, १७, २६ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ८ आहे. या मूलांकाचा स्वामी शनी आहे. हा कालावधी उत्तम ठरू शकेल. करिअर, नोकरीत सकारात्मक परिणाम प्राप्त होऊ शकतील. कुटुंबाचा पाठिंबा लाभेल. कार्यक्षेत्रात प्रगती होऊ शकेल. भागीदारीत काम केल्याने शुभ परिणाम मिळू शकतात. आर्थिक बाबींकडे विशेष लक्ष द्यावे.

ज्या व्यक्तींचा जन्म ९, १८, २७ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ९ आहे. या मूलांकाचा स्वामी मंगळ आहे. संमिश्र कालावधी ठरू शकेल. गैरसमज होऊ देऊ नका. बऱ्याच कालावधीनंतर एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकेल. कार्यक्षेत्रात प्रगती कराल. यशाच्या मार्गावर पुढे जाल. करिअरमध्ये काळ अनुकूल राहील. आर्थिक बाबींमध्ये दोन गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.